Unknown Facts : मांजर चावली तर काय कराल? डॉक्टरांकडे जाऊन किती इंजेक्शन घ्यावी लागतात? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Unknown Facts : मांजर चावली तर काय कराल? डॉक्टरांकडे जाऊन किती इंजेक्शन घ्यावी लागतात? जाणून घ्या

Unknown Facts : मांजर चावली तर काय कराल? डॉक्टरांकडे जाऊन किती इंजेक्शन घ्यावी लागतात? जाणून घ्या

Published Feb 10, 2025 11:10 AM IST

Cat Bite Treatment : कुत्राच नाही तर, मांजरीच्या चाव्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

मांजर चावली तर काय कराल? डॉक्टरांकडे जाऊन किती इंजेक्शन घ्यावी लागतात? जाणून घ्या
मांजर चावली तर काय कराल? डॉक्टरांकडे जाऊन किती इंजेक्शन घ्यावी लागतात? जाणून घ्या

Unknown Facts About Cat Bite : कुत्रा चावल्याने रेबीजसारखे गंभीर आजार होतात, ज्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते. अन्यथा, ते व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. मात्र, कुत्राच नाही तर, मांजरीच्या चाव्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात की, कुत्रा चावल्याप्रमाणे मांजर चावल्यास देखील त्वरित उपचार घेतले पाहिजेत. मग, ती जंगली मांजर असो किंवा घरात पाळलेली मांजर, उपचार हे आवश्यक आहेत. कोणताही प्राणी चवल्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घ्यायलाच हवे.

एका रिपोर्टनुसार डॉक्टर म्हणतात की, कुत्रा चावल्यास रेबीजचे इंजेक्शन दिले जातात जेणेकरून संसर्ग पसरू नये. यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीला मांजर चावली असेल, तर त्याने देखील ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात जावे. गरज पडल्यास इंजेक्शन देखील घ्यावे. मांजरीच्या चाव्याला अजिबात हलक्यात घेऊ नये. कारण, मांजर चावल्यावर देखील संसर्ग होण्याची शक्यता तितकीच असते, जितकी कुत्रा चावल्यावर असते.

मांजरीच्या चाव्यामुळे होऊ शकतो गंभीर आजार!

डॉक्टरांच्या मते, लोक सहसा मांजरीच्या चाव्याला किरकोळ दुखापत समजून दुर्लक्ष करतात, जे अजिबात योग्य नाही . मांजरीच्या चाव्यामुळे हायड्रोफोबिया नावाचा आजार होतो, जो अत्यंत धोकादायक असतो. जर, मांजरीला आधीच रेबीजची लागण झालेली असेल, तर हा आजार अधिक प्रभावी असू शकतो. अशा परिस्थितीत, जर एखाद्याला मांजरीने चावले असेल तर, ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

Unknown Fact : किचनमधील 'या' गोष्टींना कधीच नसते एक्सपायरी डेट! फेकून देण्याआधी जाणून घ्या

मांजर कुत्र्याइतकीच रेबीज संसर्ग पसरवण्यास सक्षम असते. मांजर चावल्यावरही रेबीजचे इंजेक्शन घ्यावे लागते. जर, श्रेणी १ ते ३ असेल तर रेबीजविरोधी लस दिली जाते. श्रेणी ३ मध्ये, लसीसोबत हिमोग्लोबिन देखील दिले जाते. मांजर, कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यास रुग्णालयात जाण्यापूर्वी लोकांनी काही घरगुती उपाय करून पहावेत, जेणेकरून संसर्गाचा परिणाम काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

मांजर चावल्यास काय करावे?

कुत्रा किंवा मांजर चावलेली जखम ५ ते १० मिनिटे वाहत्या नळाखाली पूर्णपणे घासून लगेच धुवावी. यामुळे विषाणूचा प्रभाव कमी होईल. यानंतर तुम्ही घरी उपलब्ध असलेले मलम देखील लावू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की कुत्र्याच्या चाव्याप्रमाणे, मांजरीच्या चाव्यासाठी देखील ४ ते ५ इंजेक्शन दिले जातात, जे पहिल्या, तिसऱ्या, सातव्या आणि अठ्ठावीसव्या दिवशी दिले जातात.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner