Baby Boy Names on Ramayana: अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकासाठी आता अवघे ४ दिवस उरले आहेत. सगळा भारत देश सध्या राममय झाला आहे. अयोध्येसोबतच देशभरात या दिवसाची जय्यत तयारी सुरू आहे. या २२ जानेवारीला भारतात दिवाळी साजरी होणार आहे. ज्यांची प्रसूतीची तारीख या महिन्यात आहे अशा अनेकप्रेग्नंट महिला सुद्धा २२ तारखेला प्रसूतीची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत या महिन्यात राम भक्तांच्या घरी नवीन मुलाचा जन्माला आला असेल तर त्याचे नाव रामायणातून प्रेरणा घेत ठेवू शकता. चला जाणून घेऊयात नावांची यादी…
भगवान राम आणि देवी सीता यांच्या दोन मुलांचे नाव लव आणि कुश होते. तुम्हाला जुळे मुलं झाली तर तुम्ही त्यांची नाव लव आणि कुश ठेवू शकता. किंवा मग एका मुलासाठी या दोनपैकी एक नाव निवडू शकता.
श्री राम यांना चार भाऊ होते. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी त्याच्या तीन लहान भावांची नावे होती. ही तिन्ही नाव युनिक आहेत. तुम्ही तुमच्या मुलासाठी यापैकी कोणतेही एक नाव निवडू शकता.
हे नाव तुमच्या मुलासाठी युनिक नाव ठरेल. याचा अर्थ तेजस्वी आणि चमकणारा असा आहे.
रामायणात बालीच्या शूर पुत्र अंगदचे नाव सर्वांनी ऐकले असेल. हे नाव एका मुलासाठी फारच युनिक आहे.
तुम्हाला हे माहितेय का की श्रीरामांना अवदेश या नावानेही संबोधले जात असे. या नावाचा अर्थ अयोध्येचा राजा असा होतो. त्यामुळे हे नाव तुमच्या मुलासाठी बेस्ट ठरेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)