मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Turmeric Tea Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचा चहा! वजन कमी होण्यासोबतच दूर राहतील ‘हे’ आजार

Turmeric Tea Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचा चहा! वजन कमी होण्यासोबतच दूर राहतील ‘हे’ आजार

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 08, 2024 10:38 AM IST

Turmeric Tea Benefits: अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या हळदीचा चहा बनवून प्यायल्याने आपल्या शरीराला बरेच फायदे मिळू शकतात.

सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचा चहा! वजन कमी होण्यासोबतच दूर राहतील ‘हे’ आजार
सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचा चहा! वजन कमी होण्यासोबतच दूर राहतील ‘हे’ आजार

Turmeric Tea Benefits: वजन कमी करण्यासाठी आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेकदा यासाठी काही लोक सकाळी लिंबू पाणी, पाण्यात मध किंवा हळद टाकून पिण्याचा सल्ला देतात.हळद ही शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या हळदीचा चहा बनवून प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. वजनासोबतच हळद रोगप्रतिकारक शक्तीसाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळे वजन तर नियंत्रणात राहिलच पण अनेक आजार देखील दूर राहतील. चला तर जाणून घेऊया हळदीचा चहा पिण्याचे बहुमुल्य फायदे...

ट्रेंडिंग न्यूज

वजन कमी करण्यासाठी हळद प्रभावी

वजन कमी करणे हे खूप अवघड काम आहे. पण, योग्य आहार आणि व्यायामाने तुम्ही लठ्ठपणा झपाट्याने कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचा चहा घेऊ शकता. असे अनेक गुणधर्म हळदीमध्ये आढळतात, ज्यामुळे तुमचा मंदावलेला चयापचय वेगाने वाढतो. हळद शरीरातील अतिरिक्त चरबी देखील काढून टाकते.

हळद हे औषधी गुणांचे भांडार!

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध हळदीमध्ये पोटॅशियम आणि लोहासोबत व्हिटॅमिन सी, फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स देखील असतात, जे वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. दालचिनीमध्ये फॉस्फरस, थायामिन, प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.

World Ovarian Cancer Day: गॅस आणि ब्लोटिंगही असू शकतात गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष

हळदीचा चहा कसा बनवायचा?

हळदीचा चहा बनवणे खूप सोपे आहे. गॅस चालू करा आणि भांड्यात एक कप पाणी उकळा. पाणी उकळायला लागल्यावर चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून मंद आचेवर उकळू द्या. काही वेळाने गॅस बंद करा आणि तुमचा हळदीचा चहा तयार आहे. गोडव्यासाठी, आपण यात एक चमचा मध आणि अर्धा चमचे लिंबाचा रस टाकू शकता. दररोज रिकाम्या पोटी हा हळदीचा चहा प्यावा.

हळद या समस्यांवर देखील प्रभावी!

रोगप्रतिकारशक्ती वाढवते : जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल, तर हळदीचा चहा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. हळदीमध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करतात. अशा परिस्थितीत हळदीचा चहा प्यायल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारख्या मौसमी आजारांचा धोका कमी होतो.

सांधेदुखी दूर होईल : हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सांधेदुखीपासून आराम देण्यासाठी प्रभावी आहेत. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल, तर सकाळी हळदीचा चहा प्यायला सुरुवात करा. हळदीमध्ये असलेली पोषक तत्व हाडे मजबूत करतात.

पोटासाठी फायदेशीर : अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांनी युक्त हळद तुमच्या पोटासाठी फायदेशीर आहे. या चहाचे सेवन केल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो.

WhatsApp channel

विभाग