Benefits of Tulsi Plant: प्रत्येकाला निरोगी राहायचे आहे, लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक आहेत आणि ते त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काहीही करत नाहीत. बरेच लोक व्यायाम करतात, बरेच लोक विविध प्रकारच्या औषधी वनस्पती वापरतात, काही लोक औषधे घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या आजूबाजूला अशा अनेक वनस्पती आहेत, ज्याचा वापर करून जीवनातील सर्वात गंभीर आजारांपासूनही दूर राहता येते.
अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खानपानाच्या सवयींमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे प्रमाण वाढले आहे. लोक आता याबाबत जागरूक होत आहेत. त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतींचा वापर करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास वनस्पतीबद्दल सांगणार आहोत ज्याच्या पानांचा वापर करून तुम्ही अत्यंत गंभीर आजारांपासूनही दूर राहू शकता. यासाठी तुम्हाला फारसा त्रास घ्यायला लागणार नाही, फक्त तुम्हाला दररोज जेवण करण्यापूर्वी सकाळी रिकाम्या पोटी या पानांचे सेवन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल.
मोठमोठ्या आजारांवर मत करण्याची क्षमता असणारे रोप इतर कोणते नसून तुळशी आहे. तुळशीला आपल्या संस्कृतीत प्रचंड महत्व आहे. सर्वसाधारणपणे सर्वांच्याच घराचा बाहेर आपल्याला तुळशीचे रोप आढळते. तुळशीला धार्मिक आणि आध्यत्मिक महत्व आहे. परंतु त्याबरोबरच तुळशीला वैद्यकीय म्हत्वसुद्धा आहे. तुळशीचे रोप हवा शुद्धीकरण करण्याचेही काम करते. धार्मिक दृष्टीकोनातून तुळशीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रोपाची पाने पूजेत वापरली जातात. शिवाय तुळशीच्या रोपाचीही पूजा केली जाते. सोबतच त्यामध्ये व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठीचे खूप उपयुक्त गुणधर्म आहेत.
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. आणि पावसाळ्यामध्ये विविध लहान-मोठे आजार उद्भवतात. खासकरून पावसाळ्यात अशुद्ध पाणी आणि थंड हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप, विविध प्रकारचे संसर्ग होत असतात. शिवाय पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली दिसून येते. अशावेळी तुळशी आपल्याला प्रचंड मदत करते. तुळशीच्या वनस्पतीचा वापर करून अनेक प्रकारचे हंगामी आजार टाळता येतात. सर्दी वगैरेच्या वेळी लोकांना तुळशीचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. पण रोज रिकाम्या पोटी याचा वापर केल्यास अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तुळशीच्या रोपाची पाने रिकाम्या पोटी वापरणे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असते. तसेच पचनासाठीही फायदेशीर असते. तुळशीमध्ये उपलब्ध असलेले गुणधर्म हे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत. शिवाय मनावरचा अतिरिक्त तणावदेखील कमी करते. तुळशीच्या पानांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुळशीची पाने श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्ती देतात. शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यामुळे जर तुम्हीही रोज रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचा वापर करत असाल तर या गंभीर आजारांपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. शिवाय तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटाशी संबंधित पचनाची समस्या, पोटात जळजळ, ऍसिडिटी इत्यादी दूर करण्यात मदत होते. त्यासोबतच शरीराची पीएच पातळी राखण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे.