Viral Garlic Eating Challenge for Glowing Skin: सुंदर आणि चमकदार त्वचा सर्वांनाच हवी असते. ते मिळवण्यासाठी लोक बऱ्याच गोष्टी करत असतात. सोशल मीडियावरही रोज काही ना काही प्रॉडक्ट किंवा चॅलेंज व्हायरल होत असते. गेल्या काही काळापासून गार्लिक इटिंग चॅलेंजही लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होत आहे. यामध्ये लोक सकाळी लवकर उठून लसणाची पाकळी खात आहेत. प्रयत्न करणाऱ्या लोकांचा दावा आहे की, काही दिवसांतच त्यांना ग्लोइंग आणि फ्लॉलेस ग्लास स्किन पाहायला मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला या चॅलेंजबद्दल सांगणार आहोत जेणेकरून तुम्हीही या सोप्या चॅलेंजचा फायदा घेऊ शकाल.
या व्हायरल चॅलेंजमध्ये लोक रिकाम्या पोटी कच्च्या लसणाची पाकळी पाण्यासोबत खात आहेत. हा लसूण थोडा वेळ चावून नंतर वरून पाणी प्यावं लागतं. साधारण अर्ध्या तासानंतर काहीतरी खा. अनेकांना ही समस्या असते की ते खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येते. यासाठी खाल्ल्यानंतर थोडे लिंबू चाटावे लागेल. यामुळे लसणाचा वास दूर होईल. तसेच चांगले ब्रश करा आणि माउथवॉशचा ही वापर करा.
जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारले तर त्याचा तुमच्या त्वचेवर तसेच आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. अनेकदा आपण महागडे क्रीम लावत राहतो, पण त्यानंतरही आपल्या चेहऱ्यावर चमक येत नाही. खरं तर जोपर्यंत तुमची तब्येत आतून चांगली होत नाही तरी बाहेर कितीही काही लावलं तरी फरक पडत नाही. लसूण आतून आपली त्वचा सुधारण्याचे काम करते.
जर तुम्ही रोज लसणाची पाकळी खाल्ली तर काही दिवसांतच तुमची त्वचा चमकू लागेल. यामुळे मुरुम, पिंपल्स आणि कोणत्याही प्रकारचे डाग कमी होतात. जर आपल्या त्वचेवर छिद्रे असतील तर ते देखील दुरुस्त करतात. यात अँटी-एजिंग गुणधर्म असतात जे आपल्याला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात. जास्त काळापर्यंत हे खाल्ल्यास तुमची त्वचाही कोरियन ग्लास स्किनसारखी चमकदार होईल.
सर्व काही प्रत्येकासाठी नसतं, त्याचप्रमाणे हे चॅलेंजही काही लोकांनी टाळायला हवं. जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर हे चॅलेंज अजिबात घेऊ नका. यासोबतच ज्या लोकांना अॅसिडिटी, पोटात जळजळ आणि लूज मोशन सारख्या पोटाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी हे करू नये. जर आपल्याला शरीरातील उष्णतेची समस्या असेल किंवा आपले रक्त पातळ असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ट्राय करू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या