Morning Drink for Crystal Clear Skin: त्चचेची नियमित काळजी घेतली नाही तर त्वचा खराब होऊ लागते. अनेक कारणांमुळे चेहऱ्याची त्वचा निर्जीव दिसू लागते. बहुतेक स्त्रियांना असे वाटते की ते फेशियल करून निस्तेज त्वचा दूर करू शकता. पण तसे नसते. काही लोकांच्या निर्जीव त्वचेचे कारण म्हणजे त्यांचा आहार असतो. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी सकाळी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. तुम्ही सकाळी जे काही खाता ते तुमच्या आरोग्यावर परिणाम करते. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही हे ड्रिंक सकाळी पिऊ शकता. जर पचनाशी संबंधित समस्या असतील तर पिंपल्स, एक्ने यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हे मॉर्निंग ड्रिंक (morning drink) तुमचे चयापचय गतिमान होण्यास आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. क्रिस्टल क्लिअर त्वचा (crystal clear skin) मिळविण्यासाठी हे ड्रिंक कसे बनवावे ते जाणून घ्या
क्रिस्टल क्लिअर त्वचा मिळवण्यासाठी तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक मदत करेल. हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -
- ओवा
- वेलची
- बडीशेप
- दालचिनी
- पाणी
- हे बनवण्यासाठी आधी पाणी गरम करा.
- पाण्याला उकळी आली की त्यात थोडे ओवा, एक वेलची, अर्धा चमचा बडीशेप आणि दालचिनीचा तुकडा घाला.
- ते चांगले उकळवा.
- चांगली उकळी आली की गाळून घ्या.
- अता हे ड्रिंक घोट घोट प्या.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे ड्रिंक फायदेशीर आहे. ते दररोज पिणे फायदेशीर ठरू शकते. ते केवळ तुमच्या त्वचेलाच नाही तर तुमच्या शरीरालाही आतून पोषण करण्यास मदत करेल.
हे चयापचय वाढवून शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हे ड्रिंक तुम्ही रोज प्याल तर त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)