How to Use Garlic for Hair Growth: केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु जर केसांची नवीन वाढ होत नसेल तर ते टक्कल पडण्याचे लक्षण आहे. जर केसांची वाढ केस गळतीनुसार होत नसेल तर काही उपाय करण्याची वेळ आली आहे हे समजून घ्या. विविध घरगुती उपायांमुळे केस गळण्याची समस्या अनेक पटींनी कमी होऊ शकते. केस गळतीवर लसूण हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे. याच्या मदतीने हेअर ग्रोथ वाढवता येते. फक्त लसूण लावण्याची ही पद्धत फॉलो करा.
लसूणमध्ये अॅलिसिन कंपाऊंड असते जे अँटी-बॅक्टेरियल म्हणून काम करते. याच्या मदतीने केस गळण्याची समस्याही कमी होऊ शकते. अॅलिसिन केसांच्या फोलिकल्सला उत्तेजित करते. ज्यामुळे केस झपाट्याने वाढतात आणि केस गळणेही थांबते. परंतु लसूण थेट टाळूवर चोळल्यास जळजळ आणि इरिटेशन होऊ शकते. तसेच केसांमध्ये लसणाचा वास सुद्धा येईल. त्यामुळे लसूण खास पद्धतीने लावा.
सर्वप्रथम एक लसूण चिरून घ्या किंवा ठेचून घ्या. आता एका काचेच्या बॉटलमध्ये ५० मिली पाणी भरून त्यात ताजे क्रश केलेले लसूण घाला. नंतर हे पाणी उन्हात किंवा उबदार जागी दोन दिवस ठेवा. नंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. हा स्प्रे केस धुण्याच्या आधी केसांच्या मुळांवर लावा आणि नंतर दोन ते तीन तासांनी केस धुवा. केसांचा लसूण पाण्याचा वास जात नसेल तर त्यात २ थेंब लिंबाचा रस घाला.
लसूणचे एलिसिन कंपाऊंड चिरल्यानंतर किंवा क्रश केल्यानंतर लगेच उडण्यास सुरवात होते. ते टिकवण्यासाठी लसूण चिरल्यानंतर लगेच पाण्यात टाकावा. जेणेकरून ते पाण्यात सक्रिय राहतील. हे लसणाचे पाणी केस गळणे, तुटणे, कोंडा यासारख्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत करेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)