मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pasta Recipes: विकेंडला नाश्त्यासाठी बनवा ट्राय करा हे हेल्दी पास्ता, हिवाळ्यात ठरेल फायदेशीर!

Pasta Recipes: विकेंडला नाश्त्यासाठी बनवा ट्राय करा हे हेल्दी पास्ता, हिवाळ्यात ठरेल फायदेशीर!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 07, 2024 09:53 AM IST

Breakfast Recipe: विकेंडला नाश्त्यासाठी काही तरी टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही या पास्ताची रेसिपी ट्राय करू शकता.

how to Make pasta
how to Make pasta (freepik)

Winter Breakfast Recipe: पास्ता हा भारतीय पदार्थ नसला तरीही आज तो जगभरात प्रसिद्ध आहे. ही एक अशी डिश आहे जी जगभर अतिशय आनंदाने खाल्ली जाते. अगदी लहान ते मोठे सगळेच हा पदार्थ अगदी चवीने खातात. पास्ता वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक प्रकारे तयार केले जाते. पास्ता वेगवेगळ्या सॉससह बनविला जातो. याचमुळे त्याची चव आणखी वाढते. तुम्हीही घरी अनेक प्रकारचे पास्ता ट्राय करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी पास्ता बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपी टेस्टी तर आहेतच यासोबत हेल्दीही आहेत.

मशरूम आणि ट्रफल तेल

मशरूम फ्राय करून त्यावर ट्रफल तेल शिंपडा. त्याचा सुगंध पास्ताला अजूनच टेस्टी बनवते. हे खूप कम्फर्ट फूड आहे.

सॉसेज आणि ब्रोकोली रिगाटोनी

या रिगाटोनी पास्ताची खरी मजा सॉसेज आणि क्रिस्पी ब्रोकोलीसोबत येते. हे खूप टेस्टी आणि आरोग्यदायी आहे.

अरॅबिआटा मीटबॉल पास्ता

अरॅबिआटा सॉससोबत मीटबॉल्स हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. हा पास्ता खायला खूप चविष्ट लागतो. त्याची मसालेदार चव तुम्हाला एका वेगळ्या झोनमध्ये घेऊन जाईल.

लिंबू लसूण कोळंबी पास्ता

लिंबू आणि लसूणमध्ये कोळंबी परतवून पास्ता बनवा. या डिशची चव खूपच चवदार असेल.

पेस्टो कोळंबी पास्ता

हा पास्ता अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, तुळस पेस्टो सॉससह बनवलेल्या या पास्त्यात कोळंबी घालून त्याची चव वाढवा.

WhatsApp channel