Viral Chutney Recipe: चटणीमुळे जेवणाची चव खूप वाढते. काही लोकांना जेवणासोबत वेगवेगळ्या प्रकारची चटणी खायला आवडते. जर तुहाला पोळी किंवा भातासोबत काही चटपटीत चव चाखायची असेल तर तुम्ही या ३ व्हायरल चटणी नक्की ट्राय करू शकता. या चटणीची रेसिपी खूप सोपी आणि या काही मिनिटांत तयार होतात.
- ३ टेबलस्पून तेल
- १ कैरी
- २ टेबलस्पून चिरलेला कांदा
- २ टोमॅटो
- २ हिरव्या मिरच्या
- ५ पाकळ्या लसूण
- चवीनुसार मीठ
- १ टेबलस्पून साखर
- १ टेबलस्पून लाल तिखट
- अर्धा टेबलस्पून जिरे पावडर
- अर्धा टेबलस्पून गरम मसाला
- कोथिंबीर
ही चटणी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि नंतर यात चिरलेली कैरी घाला. यासोबत दोन भागांमध्ये कापलेले टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण घाला. आता मंद आचेवर १० मिनिटे शिजवा. शिजवल्यानंतर टोमॅटो आणि कैरीची साल काढून यात साखर, लाल तिखट, जिरे पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, चिरलेला कांदा घालून जाडसर मॅश करा. चटणी तयार आहे, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.
- २ ते ३ काकडी
- एक चमचा भाजलेले शेंगदाणे
- २ टेबलस्पून हरभरा डाळ
- २ हिरव्या मिरच्या
- २ टेबलस्पून मोहरीचे तेल
- १ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून उडद डाळ
- १ टीस्पून हरभरा डाळ
- एक चिमूटभर हिंग
- कढीपत्ता
- दोन सुक्या लाल मिरच्या
- ३ पाकळ्या लसूण
- अर्धा चमचा जिरे
- १ टेबलस्पून लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
ही चटणी बनवण्यासाठी, काकड्या धुवून त्याचे तुकडे करा. नंतर मिक्सर ब्लेंडरमध्ये भाजलेले शेंगदाणे, हरभरा डाळ, हिरवी मिरची, लसूण, जिरे, लिंबाचा रस, मीठ आणि काकडीचे तुकडे घालून बारीक करा. आता ते एका भांड्यात काढा आणि तडका तयार करा. यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरच्या तळून घ्या. नंतर ते चटणीमध्ये मिक्स करा.
- २ मध्यम आकाराचे टोमॅटो
- २ हिरव्या मिरच्या
- ४-५ लसूण पाकळ्या
- १ छोटा कांदा
- २ चमचे तेल
- चवीनुसार मीठ
- १ टेबलस्पून लाल तिखट
- एक चमचा लिंबाचा रस
- १ टीस्पून चाट मसाला
ही चटणी बनवण्यासाठी टोमॅटो धुवून यांचे दोन तुकडे करा आणि नंतर एका पॅन मध्ये तेल गरम करा. आता हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या टोमॅटोसोबत तेलात परतून घ्या. नंतर टोमॅटो सोलून घ्या आणि शिजवलेले टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची चॉपरमध्ये घाला आणि यात मीठ, कांदा, लाल तिखट घाला. चॉपर चांगले फिरवा आणि चटणी एका भांड्यात काढा. आता यात लिंबाचा रस आणि चाट मसाला घाला आणि सर्व्ह करा.
संबंधित बातम्या