Kitchen Tips: जेवण टेस्टी बनवणे असो वा वस्तू खराब होण्यापासून रोखणे, खूप उपयुक्त आहेत या किचन टिप्स-try these useful kitchen tips and hacks to increase taste and stop wastage ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: जेवण टेस्टी बनवणे असो वा वस्तू खराब होण्यापासून रोखणे, खूप उपयुक्त आहेत या किचन टिप्स

Kitchen Tips: जेवण टेस्टी बनवणे असो वा वस्तू खराब होण्यापासून रोखणे, खूप उपयुक्त आहेत या किचन टिप्स

Sep 18, 2024 10:11 PM IST

Kitchen Hacks: स्वयंपाकघरात ठेवलेले पीठ जुने होऊन त्याला वास येऊ लागला किंवा उपमा चविष्ट होत नाही. या सर्व गोष्टींसाठी पाहा आश्चर्यकारक किचन हॅक्स, जे तुमचे दैनंदिन किचनमधील काम सोपे करतील.

किचन टिप्स आणि हॅक्स
किचन टिप्स आणि हॅक्स

Useful Kitchen Tips and Hacks: स्वयंपाकघरातील कच्च्या किंवा साठवलेल्या खाद्यपदार्थांची काळजी घेणेही गरजेचे आहे. तरच तुमचे स्वयंपाकघर नीट राहते. मालाची योग्य प्रकारे साठवणूक केली नाही तर ते खराब होतील. अन्न शिल्लक असेल तर ते पुन्हा कसे वापरावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. किचनमधील हे आश्चर्यकारक हॅक्स या कामात तुमची मदत करतील. जाणून घ्या असे उपयुक्त किचन टिप्स आणि हॅक्स, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या सुटतील.

पीठ स्टोअर करण्याची पद्धत

घरात पीठ जास्त असेल तर ते व्यवस्थित साठवणं गरजेचं आहे, अन्यथा काही काळानंतर पीठ जुनं होऊन त्याला वेगळा वास येऊ लागतो. जर आपल्याला आपले पीठ नेहमी ताजे आणि कीटकांपासून दूर ठेवायचे असेल तर फक्त पीठात थोडी तमालपत्रे घाला. पीठ बराच वेळ ताजे राहील.

गंजापासून सुटका मिळवण्यासाठी स्मार्ट ट्रिक

लोखंडी चाकू, कढई, तवा किंवा कोणत्याही भांड्यात गंज असेल तर फक्त कांदा कापून गंजलेल्या जागेवर चोळून त्यापासून सुटका मिळवा. सर्व गंज साफ होऊन जाईल.

उरलेल्या सलादचे काय करावे

अनेकदा घरात सलाद कापलेला ठेवला जातो. हे चिरलेले सलाद फेकण्याऐवजी मिक्सरमध्ये थोडे जाडसर बारीक करून पिठात मिसळावे. चविष्ट पराठे तयार होतील. किंवा पावभाजीमध्ये हे सलाद मिक्स करा. टेस्ट आणखी वाढेल.

स्टीलची भांडी चिकटली तर काय करायचे

अनेक वेळा स्टीलची भांडी एकात घुसून मग चिकटतात. ही भांडी वेगळी करण्यासाठी फक्त कडांवर तेल घाला. असे केल्याने थोड्याच वेळात भांडी एकमेकांपासून वेगळी होतील.

उपमा चविष्ट कसा बनवावा

जर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये उपमा बनवत असाल तर पुढच्या वेळी रव्यामध्ये पाण्यासोबत थोडं दही घाला. असे केल्याने उपम्याची चव चांगली तर येईलच, पण उपमा एकदम मोकळा आणि मऊ होईल.

बेसनाचे लाडू खाल्ल्याने जड वाटते

बेसनाचे लाडू आवडतात पण खाल्ल्यानंतर पोट जड होते. त्यामुळे लाडू बनवण्यासाठी बेसन भाजण्यापूर्वी तुपात एक चमचा हळद भाजून घ्या. नंतर बेसन घालून भाजून घ्या. असे केल्याने बेसनाचे लाडू खाल्ल्याने गॅस होणार नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग