Cooking Tips to Make Food Tasty: अनेक वेळा घरच्या जेवणाला रेस्टॉरंटसारखी चव येण्यासाठी महिला विविध प्रयोग करून पाहतात. तरी सुद्धा कधी कधी हवे तसे टेस्टी जेवण बनत नाही. तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी तुमच्या स्वयंपाकाबद्दल तक्रार केली असेल आणि तुमची प्रशंसा झाली नसेल तर टेस्टी जेवण बनवण्यासाठी काही कुकिंग टिप्स लक्षात ठेवा. या टिप्सच्या मदतीने साधे अन्न देखील उत्तम प्रकारे चविष्ट होईल. पाहा या सोप्या कुकिंग टिप्स कोणत्या आहेत, ज्या तुमचे जेवण टेस्टी करतील.
- जर तुम्ही कांदे भाजून ग्रेव्ही बनवत असाल तर कांदे भाजताना त्यात थोडे मीठ टाका. याने कांदा लवकर भाजतो आणि रंगही छान येतो.
- बिर्याणीसाठी कांदा तळताना परफेक्ट ब्राऊन रंग हवा असेल तर थोडी साखर घाला. यामुळे कांद्याला खूप छान तपकिरी रंग येईल.
- सलादसाठी भाज्या धुवायची असतील तर तुरटी मिसळलेल्या पाण्यात एकदा धुवा. हे भाज्यांमधून कीटकनाशके आणि बॅक्टेरिया पूर्णपणे काढून टाकेल.
- पुरीचे पीठ मळून घेतल्यानंतर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे पुरी कमी तेल शोषणार.
- पराठे मऊ आणि गुळगुळीत करायचे असतील तर पीठ मळताना उकडलेला बटाटा घाला. त्यामुळे पराठे एकदम मऊ होतात.
- रायता बनवताना दह्यात भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकण्याऐवजी हिंग आणि जिरे मसाला घाला. त्यामुळे रायत्याची चव वाढेल.
- कढी उकळेपर्यंत ढवळत राहावे. नाहीतर कढी भांड्याच्या तळाला चिकटून राहते.
- भजे, पकोड्याच्या बॅटरमध्ये चिमूटभर आरारोट आणि गरम तेल घाला. यामुळे पकोडे कुरकुरीत होतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)