Unique Ideas To Decorate Christmas Tree: वर्षातील शेवटचा सर्वात मोठा सण म्हणजे ख्रिसमस देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या पूर्वी घर आणि ख्रिसमस ट्री सजवले जाते. ख्रिसमस घरात साजरा केला जात असो किंवा नसो, लोक घरी ख्रिसमस ट्री नक्कीच आणतात आणि ते सजवतात. लहान मुलांसह मोठ्यांमध्ये सुद्धा ख्रिसमस ट्री सजवण्याची क्रेझ पहायला मिळते. आपला ख्रिसमस ट्री वेगळा दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीत ते सजवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. तुम्ही तुमच्या घरचा ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी काही काही यूनिक आयडिया ट्राय करू शकता.
ख्रिसमसचा सण हा आनंदाचा सण असतो. हा सण सर्वजण हर्षोल्लासात साजरा करतात. तुमच्या घरी ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी तुम्ही तुमचे आणि परिवारातील इतर सदस्यांचे फोटो वापरू शकता. फॅमिली फोटोंसोबतच मित्रांचे फोटोही त्यात ठेवता येतात. ही एक यूनिक आयडिया आहे जी तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना खूप आवडेल.
प्रत्येकजण कापूस किंवा बेलने ख्रिसमस ट्री सजवतो. जर तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुम्ही ते कार्ड्सच्या मदतीने सजवू शकता. या कार्डमध्ये तुम्ही तुमची इच्छा, नवीन वर्षाचा संकल्प लिहू शकता. तसेच तुम्ही यावर शुभेच्छा संदेश सुद्धा लिहू शकता. तुम्ही तुमच्या ख्रिसमस ट्री जवळ काही ब्लँक कार्ड ठेवू शकता. जेणेकरून घरी आलेले पाहुणे त्यावर संदेश किंवा शुभेच्छा लिहून ट्रीवर लावू शकतील.
लहान बाळांचे मोजे खूपच क्यूट दिसतात. तुम्ही ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी या सॉक्सचा वापर करू शकता. या रंगबेरंगी छोट्या छोट्या सॉक्सने तुमचे ख्रिसमस ट्री खूप सुंदर दिसेल.
तुम्ही तुमचे ख्रिसमस ट्री लाईटिंगच्या मदतीने सुद्धा सजवू शकता. यासाठी तुम्ही फेरी लाइट्सचा वापर करू शकता. किंवा तुम्ही झाडाभोवती स्पॉट लाइट्स देखील लावू शकता. यामुळे तुमच्या ख्रिसमस ट्रीला आकर्षक लूक मिळेल.
ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी तुम्ही चॉकलेट वापरू शकता. यासाठी तुम्ही छोटे छोटे चॉकलेटचा वापर करू शकता. बाजारात मिळणारे चॉकलेट आणि काही हँडमेड चॉकलेट रंगबीरंगी कागदात रॅप करून तुम्ही ते ख्रिसमस ट्रीवर लावू शकता. चॉकलेटने सजलेले ख्रिसमस ट्री खूप छान दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या