मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Trendy Saree: वेडिंग पार्टीमध्ये गॉर्जियस दिसायचंय? ट्राय करा या ट्रेंडी साडी

Trendy Saree: वेडिंग पार्टीमध्ये गॉर्जियस दिसायचंय? ट्राय करा या ट्रेंडी साडी

Jan 16, 2024 09:42 PM IST

Wedding Fashion Tips: तुमच्या जवळच्या मित्राचं किंवा कझिनचं लग्न असेल आणि तुम्ही साडी नेसायचा विचार करताय का? तर यावर्षीच्या या ट्रेंडी साड्या तुम्हाला आकर्षक लूक देतील.

ट्रेंडी साडी
ट्रेंडी साडी

Trendy Sarees for Wedding Party: घरात कझिन भाऊ किंवा बहिणीचे लग्न असो किंवा जवळच्या मित्र मैत्रिणीचे लग्न, कपड्यांमध्ये पहिली पसंती साडीला असते. मुलींची साडीची क्रेझ कधीच संपत नाही. महिलांसाठी हा सदाबहार आउटफिट आहे, जे पारंपारिक ते स्टायलिश आणि गॉर्जियसपर्यंत कोणत्याही प्रकारे कॅरी करता येते. या लग्नाच्या सीझनमध्ये जर तुम्ही मित्राच्या किंवा कझिनच्या लग्नात साडी नेसण्याचा विचार करत असाल तर या ट्रेंडी साड्या ट्राय करा. अभिनेत्रींच्या स्टाईलवरुन इंस्पिरेशन घेऊन तुम्ही गॉर्जियस आणि सुंदर दिसू शकता.

फ्लोरल प्रिंट

फ्लोरल प्रिंटची फॅशन यावर्षीही पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला वेडिंग पार्टीमध्ये लाइटवेट आणि सुंदर लूक असणारी साडी नेसायची असेल तर फ्लोरल प्रिंट्स उत्तम दिसतील. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण त्यांना अनेक प्रकारे सहजपणे स्टाईल करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हेवी किंवा लाइट ज्वेलरी कॅरी करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

बोल्ड प्रिंट

बोल्ड प्रिंट लाइनिंग, अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट आजकाल ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्ही तुमच्या मित्राच्या लग्नात बोल्ड आणि सुंदर लुकचा विचार करत असाल तर मनीष मल्होत्राने बनवलेल्या या साड्या तुम्हाला फॅशन इंस्पिरेशन नक्कीच देऊ शकतात. कृती सेनन बोल्ड कलर असलेली लाइनिंग साडीमध्ये तर शर्वरी वाघ ब्लँक अँड व्हाइट अ‍ॅबस्ट्रॅक्ट पॅटर्नच्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे. हे तुम्ही सहज कॉपी करु शकता.

टिश्यू साडी

यावेळी लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही हेवी लूकसाठी टिश्यू फॅब्रिकची साडी ट्राय करू शकता. विशेषतः गोल्डन, सिल्व्हर आणि मेटॅलिक शेड्स अभिनेत्रींची पहिली पसंती राहिली आहेत. त्यापासून तुम्हीही स्टाइल टिप्स घेऊ शकता.

 

वाईड बॉर्डर आणि बोल्ड कलर

सिल्क साड्या आणि त्यांच्या बॉर्डर सदाबहार आहेत. पण यावेळी तीच लाल किंवा पिवळी साडी निवडण्याऐवजी गुलाबी किंवा जांभळ्यासारखा थोडासा ब्राइट कलर निवडा. साडीच्या रंगासोबत वाइड बॉर्डर आणि पल्लूसोबत दिसण्यासाठी पुरेसे असतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel