Shravan Vrat Recipe: गोड खाऊन श्रावण सोमवारचा उपवास सोडता का? घरी झटपट तयार करा या रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shravan Vrat Recipe: गोड खाऊन श्रावण सोमवारचा उपवास सोडता का? घरी झटपट तयार करा या रेसिपी

Shravan Vrat Recipe: गोड खाऊन श्रावण सोमवारचा उपवास सोडता का? घरी झटपट तयार करा या रेसिपी

Published Aug 12, 2024 08:46 PM IST

Shravan Somvar Special: श्रावण उपवासात बहुतेक लोक मीठ खाणे सोडून देतात. या काळात जे उपवास ठेवतात, ते गोड खाऊन उपवास सोडतात. तुम्हीही जर गोड खाऊन सोडत असाल तर या रेसिपी ट्राय करू शकता.

उपवासासाठी स्वीट डिश रेसिपी
उपवासासाठी स्वीट डिश रेसिपी (unsplash)

Sweet Dishes Recipe: श्रावण महिन्यात बहुतेक लोक सोमवारी उपवास करतात. जे लोक उपवास ठेवत नाहीत ते शिवाची पूजा करतात आणि प्रसाद अर्पण करून स्वत: सात्विक भोजन करतात. या महिन्यात उपवास करणारे लोक अनेकदा गोड खाऊन उपवास सोडतात. तुम्ही सुद्धा श्रावण सोमवारचा उपवास गोड खाऊन सोडत असाल तर या रेसिपी ट्राय करू शकता. या अशा रेसिपी आहेत ज्या सहज तयार होतील आणि भोलेनाथांनाही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. जाणून घ्या स्वीट डिशेसची रेसिपी.

बासुंदी

श्रावण सोमवारचे उपवास सोडण्यासाठी तुम्ही बासुंदी बनवू शकता. ते बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दूध घ्या आणि नंतर मध्यम आचेवर उकळा. उकळायला लागताच गॅस मध्यम-कमी करावा. हे दूध अर्धे होईपर्यंत उकळा. हे अधून मधून ढवळत राहा. दूध अर्धे राहिले की त्यात साखर घालून मिक्स करा. त्यात वेलची पूड आणि ताजी जायफळ पावडर घाला. आता त्यात केशर आणि चिरलेले ड्राय फ्रूट्स घाला. चांगले मिक्स करून ५ मिनिटे उकळू द्या. बासुंदी थोडी घट्ट झाली की गॅस बंद करा. बासुंदी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

श्रीखंड

उपवास सोडण्यासाठी श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम गरम दुधात केशर बारीक करून विरघळवावे. नंतर हंग कर्ड एका भांड्यात काढा. नंतर त्यात बारीक केलेली साखर, केशर दूध घाला. चमच्याने फिरवून मिक्स करा. आता त्यात वेलची पूड आणि चिरलेले ड्राय फ्रूट्स घाला. श्रीखंड तयार आहे. थंडगार सर्व्ह करा.

शिंगाड्याचा हलवा 

उपवासासाठी ही उत्तम रेसिपी आहे. ते बनवण्यासाठी मध्यम आचेवर कढईत तूप गरम करावे. नंतर त्यात शिंगाड्याचे पीठ घालून चांगले मिक्स करावे. तुपात शिंगाड्याचे पीठ सतत हलवत भाजा, जोपर्यंत ते हलके तपकिरी होत नाही. आता शिंगाड्याच्या पिठात गरम पाणी घालून मिक्स करा. नंतर पाणी कोरडे झाल्यावर त्यात साखर घालून चांगले मिक्स करा. हलव्यातून तूप निघेपर्यंत ढवळून शिजवत राहा. नंतर त्यात वेलची पूड घालून मिक्स करा. हलव्याला बदामाने सजवून गरमा गरम सर्व्ह करा.

रताळ्याचा शिरा

हे बनवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये रताळे उकळून घ्या. नंतर उकळलेले रताळे सोलून मॅशन करा. आता मध्यम आचेवर कढईत तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात मॅश केलेले रताळे घाला. ते मिक्स करा, सतत ढवळा, आणि घट्ट होईपर्यंत आणि पॅनच्या बाजू सोडेपर्यंत शिजवा. नंतर त्यात दूध घालून मिक्स करून सतत ढवळत शिजवावे. नंतर त्यात साखर घाला. पुन्हा घट्ट होईपर्यंत शिजवा आणि शेवटी चिरलेले बदाम घालून सर्व्ह करा.

Whats_app_banner