Summer Cooler Recipe: झपाट्याने वाढणारे तापमान आणि घसा कोरडा पडणे हे सामान्य आहे. अशा स्थितीत घशाला थंडगार पेय आराम देऊ शकतात. काही शरबत तुम्हाला तुमचे पोट आणि घसा थंड ठेवण्यास मदत करेल. उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी नेहा पांडे काही रेसिपी सांगत आहे. जाणून घ्या समर कूलर रेसिपी.
हे बनवण्यासाठी साहित्य
- बेल फळ १
- गूळ किंवा साखर चवीनुसार
- भाजलेले जिरे पावडर १ टीस्पून
- काळे मीठ चवीनुसार
- लिंबाचा रस २ चमचे
- पुदिन्याची पाने गार्निशिंगसाठी
- आवश्यकतेनुसार थंड पाणी
- बर्फाचे तुकडे आवश्यकतेनुसार
पुदिन्याची पाने धुवून त्यांचे अगदी लहान तुकडे करा आणि हाताने मॅश करा. बेल फळाचे दोन तुकडे करा आणि चमच्याने सर्व गर बाहेर काढा. एका मोठ्या भांड्यात गर ठेवा. त्यात थोडे पाणी घालून हे गर हाताने मॅश करा म्हणजे गरातील बिया वेगळे होतील. आता हे मिश्रण चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या म्हणजे बिया आणि सर्व तंतू निघून जातील. जर मिश्रण घट्ट असेल तर कमी प्रमाणात पाणी घालत रहा. सर्व गर गाळून झाल्यावर त्यात साखर किंवा गूळ, लिंबाचा रस, सर्व मसाले आणि पुदिन्याची पाने घालून मिक्स करा. आता यात पाणी आणि बर्फाचे तुकडे घालून चांगले मिक्स करा आणि सर्व्ह करा.
मसाला ताक बनवण्यासाठी साहित्य
- दही १ कप
- थंड पाणी २ कप
- हिरवी मिरची १
- आले १ छोटा तुकडा
- बारीक चिरलेली कोथिंबीर २ चमचे
- भाजलेले जिरे पावडर १/२ टीस्पून
- काळे मीठ १/२ टीस्पून
- मीठ चवीनुसार
- चाट मसाला १/४ टीस्पून
- पुदिना गार्निशिंगसाठी
ताक बवनण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य ग्राइंडरच्या जारमध्ये ठेवा आणि काही मिनिटे चांगले ब्लेंड करा. आता हे सर्व्हिंग ग्लासमध्ये घाला. पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.
संबंधित बातम्या