थंडीच्या सिजनमध्ये शरीर बाहेरूनच नाही तर आतूनही गरम ठेवणे गरजेचे आहे. आतून शरीर गरम ठेवण्यासाठी आहारात योग्य ते पदार्थ घेणे गरजेचे आहे. हे थंडीच्या दुष्परिणामांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. थंडीत आपल्याला अनेकदा गरमागरम आणि चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. हे बाहेरच्या कमी तापमानामुळे होते. अशावेळी बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही घरीच काही चवदार आणि आरोग्यदायी सूप बनवू शकता. या सूपच्या सेवनाने तुमचे शरीर आतून उबदार राहील, ज्यामुळे तुम्हाला थंडी जाणवणार नाही. चला जाणून घेऊया काही स्वादिष्ट सूप रेसिपी.
गाजर हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच अद्रक शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. त्यामुळे या दोन्ही पदार्थाचे सूप बनवून पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. हे सूप बनवण्यासाठी गाजर सोलून कापून त्यात ऑलिव्ह ऑईल आणि मीठ घालून परतून तळून घ्या. यानंतर इतर भाजी गरम करून त्यात आले घालून १५ मिनिटे उकळा. यानंतर, कांदा तळून घ्या आणि बाकीच्या मिश्रणात गाजर मिसळा. ५-१० मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि गरम सर्व्ह करा.
टोमॅटो सूप फार प्रसिद्ध आहे. हे सूप फारच कोमनं आणि चविष्ट असते. याची चव गोड-आंबट असते. हे सूप बनवणे खूप सोपे आहे. हे सूप बनवण्यासाठी टोमॅटो उकळवा, सोलून घ्या आणि बिया काढून टाका. यानंतर त्याची प्युरी करून त्यात मीठ, मिरपूड, कोथिंबीर आणि थाईम घालून थोडा वेळ उकळवा. यानंतर त्यावर थोडी क्रीम टाका आणि तुमचे टोमॅटो सूप तयार आहे.
मशरूमने व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होते आणि इतर फायदे देखील मिळतात. मशरूम सूप बनवण्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे बटर गरम करा, त्यात बदाम आणि मशरूम घाला आणि हलके तळून घ्या.यानंतर त्यात मैदा घालून मंद आचेवर शिजवा. यानंतर त्यात थोडे पाणी घालावे. उकळल्यावर बदाम दुधात बारीक करून टाका. यानंतर त्यात मीठ आणि मिरपूड घाला. ५-७ मिनिटे शिजल्यानंतर त्यात क्रीम घालून गरमागरम सर्व्ह करा.