Skin Remedies: चेहऱ्यावर डार्क पॅचेस आणि ड्रायनेस दिसत असेल तर ट्राय करा हे उपाय, होईल फायदा-try these skin remedies to remove dark patches dryness wrinkles on skin ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Remedies: चेहऱ्यावर डार्क पॅचेस आणि ड्रायनेस दिसत असेल तर ट्राय करा हे उपाय, होईल फायदा

Skin Remedies: चेहऱ्यावर डार्क पॅचेस आणि ड्रायनेस दिसत असेल तर ट्राय करा हे उपाय, होईल फायदा

May 24, 2024 02:31 PM IST

Dark Patches, Dryness, Wrinkles: जर चेहऱ्याच्या त्वचेवर ड्रायनेस दिसत असेल आणि डार्क पॅचेस झाले असतील तर या तीन गोष्टी तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये समाविष्ट करा. यामुळे अकाली सुरकुत्या सुद्धा दूर राहतील.

चेहऱ्यावरील डार्क पॅचेस, ड्रायनेस आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी उपाय
चेहऱ्यावरील डार्क पॅचेस, ड्रायनेस आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी उपाय

Remedies to Remove Dark Patches, Dryness, Wrinkles on Skin: चेहऱ्याची त्वचा खूप मऊ असते. त्यामुळे त्याची नेहमीच जास्त काळजी घ्यावी लागते. विशेषत: जेव्हा तुम्ही वयाची ३० वर्षे ओलांडता तेव्हा तुमची त्वचा यूथफुल आणि यंग दिसण्यासाठी तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती वस्तूंचा समावेश करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व तर दिसणार नाहीच, शिवाय महागड्या ट्रीटमेंटवर जास्त पैसेही वाया घालवावे लागणार नाहीत. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर डार्क पॅचेस दिसतात आणि त्यांची त्वचा कोरडी होत असते. कारण कोरडी त्वचा आपली लवचिकता झपाट्याने गमावते आणि त्वचा सैल होते. त्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. तुम्हालाही अशा समस्या असतील तर तुम्ही घरच्या घरी काही सोपे उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या स्किन केअर पद्धती आहेत ज्या घरबसल्या वापरल्या पाहिजेत.

एलोवेरा जेल आहे त्वचेचा साथीदार

जर तुम्हाला एलोवेरा जेलची एलर्जी नसेल तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये त्याचा नक्कीच समावेश करा. हे केवळ त्वचेला थंडच करत नाही तर त्वचेवरील कोणत्याही रसायनाचा वाईट परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करते. त्वचेचे हायड्रेशन असो किंवा त्वचेला ताजेपणा देणे असो, एलोवेरा जेलचे नाव सर्वात आधी येते. त्यामुळे दररोज कोरफडीचे जेल थेट चेहऱ्यावर लावा आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा. ते त्वचेला हायड्रेट करते.

नैसर्गिक सनस्क्रीन लावा

सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी केमिकल फ्री सनस्क्रीन बनवू शकता. खोबरेल तेल, शिया बटर आणि झिंक ऑक्साईड एकत्र करून बाजूला ठेवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करेल.

डेड स्किन काढा

त्वचेवर साचलेला डेड स्किनचा थर नक्की काढा. ते काढण्यासाठी नैसर्गिक स्क्रब बनवा. तांदळाचे पीठ आणि दही नीट मिक्स करून त्यात चिमूटभर हळद घाला. हे नैसर्गिक स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि डेड स्किन सहज निघून जाईल. दही त्वचा सहज स्वच्छ करण्यास मदत करेल आणि ओलावा देखील देईल. यासोबतच त्वचेवरील काळे डागही हळूहळू कमी होऊ लागतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग