Detox Drinks for Belly Fat and Digestion: दिवाळीचा सण म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ असते. तुम्ही सुद्धा दिवाळीच्या काळात भरपूर पदार्थ खाल्ले असतील. आरोग्याची काळजी घेत असले तरी प्रत्येकजण काही ना काही अनहेल्दी पदार्थ खातो. अशा स्थितीत पचनक्रिया बिघडते आणि पोटाची चरबीही वाढू लागते. जर तुम्हाला पोटावर ट्रान्सफॅट जमा होण्यापासून रोखायचे असेल, चयापचय वाढवायचे असेल, पचनक्रिया चांगली ठेवायची असेल आणि पोटावर चरबी जमा होणार नाही तर या ड्रिंक्सचा तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये समावेश करा. हे प्रभावी पेय पोटाची चरबी वाढण्यापासून रोखेल.
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड असते. जे केवळ इन्सुलिनची पातळी कमी करत नाही तर चयापचय सुधारते. हे भूक कमी करण्यास आणि चरबी जाळण्यास देखील मदत करते. ज्यामुळे तुम्ही दिवाळीनंतर वाढलेले वजन टाळू शकता. अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून दररोज प्या.
तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये फळांच्या रसाऐवजी भाज्यांचा रस समाविष्ट करा. हे वजन कमी करण्यास मदत करतील. भाज्यांच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोट भरलेले राहते. तसेच कमी उष्मांक असलेले पेय असल्याने ते सकाळसाठी उत्तम आहे. दिवाळीनंतर तुम्ही दररोज दुधी भोपळ्याचा रस पिऊ शकता.
चयापचय सुधारण्यासाठी ग्रीन टी हे सर्वोत्तम पेय आहे. दिवसातून २-३ वेळा प्यायल्याने फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी हे सर्वात प्रभावी पेय आहे. हे दररोज प्यायल्याने पोटाची चरबी आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होईल.
रोजच्या दुधाच्या चहाऐवजी सकाळच्या रुटीनमध्ये लिंबू मिसळलेला ब्लॅक चहा प्या. ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनॉल तसेच शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते. दररोज ३ कप काळा चहा प्यायल्याने शरीराचे वजन नियंत्रित राहते.
पचन सुधारण्यासोबतच ओव्याचा चहा प्यायल्याने थंडीपासूनही बचाव होतो. याशिवाय हे पेय वाढलेले पोट कमी करण्यास देखील मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)