मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lehenga Design: लग्न समारंभात घालायला लेहेंगा शोधताय? मदत करतील या डिझाइन्स

Lehenga Design: लग्न समारंभात घालायला लेहेंगा शोधताय? मदत करतील या डिझाइन्स

Nov 30, 2023 10:09 PM IST

Wedding Fashion Tips: जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नासाठी लेहेंग्याची यूनिक डिझाइन हवी असेल, तर अभिनेत्रीचे हे सुंदर लेहेंगा पहा. या लेहेंगांमुळे तुम्ही गर्दीतही हटके आणि सुंदर दिसाल.

लग्न समारंभासाठी ट्रेंडी लेहेंगा डिझाइन
लग्न समारंभासाठी ट्रेंडी लेहेंगा डिझाइन

Latest Trendy Lehenga Design: लग्नाचा सीझन चालू आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या मित्राच्या लग्नात जायचे असेल. बहुतेक मुलींना लग्नात लेहेंगा घालायला आवडते. पण जर तुम्हाला तेच रुटीन लेहेंग्याचे डिझाइन आवडत नसेल तर यावेळी लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही हे लेटेस्ट ट्रेंडी डिझाईनचे लेहेंगा ट्राय करू शकता. जे तुम्हाला मुलींच्या गर्दीत पूर्णपणे हटके लूक देईल.

ट्रेंडिंग न्यूज

रकुल प्रीत सिंगचा फिश कट लेहेंगा

बहुतेक लेहेंगा ए-लाइन डिझाइनमध्ये असतात. अशा परिस्थितीत हा स्ट्रेट फिश कट लेहेंगा पूर्णपणे हटके लुक देईल. जर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नासाठी तयार होणार असाल तर लेहेंग्याची ही डिझाइन अगदी उत्तम आहे. तसेच फुल स्लीव्ह डिझाइनमुळे थंडीपासून बचाव होण्यास मदत होईल.

मृणाल ठाकूरचा टुले लेहेंगा स्कर्ट

जर तुम्हाला तुमच्या मित्राच्या लग्नात डान्स करण्याची संधी सोडायची नसेल, तर तुम्ही मृणाल ठाकूरसारखा टुले डिझाइनचा लेहेंगा निवडू शकता. हेवी ब्लाउज आणि एम्ब्रॉयडरी डिझाइन बेल्टसह टुले फॅब्रिकचा हलका लेहेंगा स्कर्ट पारंपारिक तसेच सुंदर लुक देईल. याशिवाय त्याची लांबी देखील तुम्हाला लग्नात मजा करण्याची भरपूर संधी देईल.

नुसरत भरूचाचा प्रिंटेड लेहेंगा

नुसरत भरूचाप्रमाणेच तुम्ही प्रिंटेड डिझाइनचा लेहेंगा देखील निवडू शकता. ज्यामध्ये चुनरीऐवजी केप स्लीव्हज श्रग जॅकेट मॅच केले आहे. हे कंफर्टेबल असण्यासोबतच ते तुम्हाला सगळ्यांमध्ये हटके लुक देईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel