Kitchen Tips: कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स, प्रत्येक जण खाणार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स, प्रत्येक जण खाणार

Kitchen Tips: कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स, प्रत्येक जण खाणार

Jan 19, 2024 10:18 PM IST

Bitterness of Karela: कारल्याच्या कडूपणामुळे प्रत्येक जण ते खाणे टाळतात. पण तुम्ही काही सोप्या टिप्सने कारल्याचा कडूपणा दूर करू शकता.

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी टिप्स
कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Remove Bitterness of Karela: मधुमेह नियंत्रणापासून ते रक्त शुद्ध करण्यापर्यंत कारले खाल्ल्याने अनेक फायदे होतात. आरोग्यासाठी इतकं फायदेशीर असूनही कडूपणामुळे बहुतेक लोक कारले खाणं टाळतात. कडू चवीमुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी कारले खाण्यास नकार दिला तर या किचन टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. या किचन टिप्सने तुम्ही कारल्याचा कडूपणा सहज दूर करू शकता.

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी टिप्स

मीठ

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी प्रथम कारले कापून घ्या. त्यावर मीठ शिंपडा आणि २० मिनिटे बाजूला ठेवा. कारल्याला मीठ लावून सोडल्याने त्याचा सर्व कडू रस निघून जातो. २० मिनिटांनंतर तुम्ही कारले पिळून भाजी बनवू शकता. कारल्याला कडू चव लागणार नाही.

चिंच

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी चिंचेचा कोळ आणि पाण्याचे द्रावण तयार करून त्यात चिरलेले कारले अर्धा तास भिजत ठेवा. चिंचेचा आंबटपणा कारल्याचा कडूपणा कमी करण्यास मदत करतो. भाजी बनवण्यापूर्वी चिंचेच्या पाण्यातून कारले काढून स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने तुमची भाजी खूप चविष्ट होईल.

लिंबू

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी प्रथम कारल्याचे तुकडे करा आणि १५ ते २० मिनिटे लिंबाच्या रसात ठेवा. लिंबाच्या रसाचा आंबटपणा कारल्याचा कडूपणा कमी करण्यास मदत करतो. भाजी तयार करण्यापूर्वी कारले स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

 

ब्लँचिंग

कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी तुम्ही ब्लँचिंगची पद्धत देखील वापरून पाहू शकता. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळून त्यात चिरलेले कारले टाकून ५ मिनिटे उकळवा. आता एका भांड्यात कारले टाकून त्यावर बर्फाचे तुकडे टाका. यानंतर कारल्यातील पाणी काढून टाका आणि भाजी तयार करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner