Natural Scrub to Remove Blackheads: चेहऱ्यावरील डेड स्किन अनेकदा लवकर जात नाही. ज्याचे कारण म्हणजे धूळ, माती आणि प्रदूषण. त्यामुळे त्वचा पूर्णपणे निर्जीव होते. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स ही देखील एक समस्या आहे जी खूपच खराब दिसते. हेब्लॅकहेड्स विशेषतः नाक आणि त्याच्या आजूबाजूच्या गालावर आणि चेहऱ्याच्या भागावर दिसतात. अनेक वेळा हे क्लीन केल्यानंतर काही काळातच पुन्हा येतात. तुम्हाला सुद्धा ब्लॅकहेड्सची समस्या असेल, ब्लॅकहेड्स पुन्हा पुन्हा येत असतील तर तुम्ही हा नैसर्गिक स्क्रब वापरू शकता. चेहऱ्यावरील हेब्लॅकहेड्स साफ करण्यासाठी घरी बनवलेला हा नैसर्गिक स्क्रब खूप प्रभावी आहे. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घ्या ब्लॅकहेड्ट दूर करण्यासाठी होममेड नैसर्गिक स्क्रब कसा बनवायचा.
हा नैसर्गिक स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -
- एक चमचा तांदळाचे पीठ
- दही
- एक चमचा लाल मसूर डाळीचे पीठ
घरी हा नैसर्गिक स्क्रब बनवण्यासाठी या तीन गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा. त्यानंतर चेहरा नीट धुतल्यानंतर हा स्क्रब लावून हलक्या हाताने मसाज करा. साधारण साठ सेकंद मसाज केल्यानंतर ते चेहऱ्यावर तसेच राहू द्या. हे नंतर वीस मिनिटांनी पाण्याने नीट स्वच्छ करा. यामुळे त्वचेवर जमा झालेले ब्लॅकहेड्स दूर होण्यास मदत होईल आणि त्वचा चांगली स्वच्छ होईल.
लाल मसूरची डाळ त्वचा गोरी तर करेलच शिवाय चमकही देते. तर तांदळाचे पीठ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते त्वचेला एक्सफोलिएट करते आणि मऊ देखील करते. या स्क्रबमध्ये दही घातल्याने त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायझेशन मिळते आणि ते स्वच्छही होते. या तीन गोष्टी मिक्स करून रोज लावल्याने ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि डेड स्किनची समस्या पूर्णपणे दूर होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या