मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Itchy Scalp: पावसाळ्यात टाळूला खाज सुटण्याचा त्रास आहे का? समस्या सोडवतील हे घरगुती उपाय

Itchy Scalp: पावसाळ्यात टाळूला खाज सुटण्याचा त्रास आहे का? समस्या सोडवतील हे घरगुती उपाय

Jul 10, 2024 11:05 AM IST

Monsoon Care Tips: डोक्याला जास्त खाज सुटल्यामुळे तुम्हीही त्रस्त असाल तर काळजी करू नका. हे घरगुती उपाय तुमची समस्या सोडवण्यास मदत करू शकतात.

टाळूला खास सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय
टाळूला खास सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय (freepik)

Home Remedies to Fix Itchy Scalp Problem: पावसाळा सुरू होताच केसांशी संबंधित अनेक समस्याही व्यक्तीला सतावू लागतात. हेच कारण आहे की या ऋतूत हेअर केअरशी संबंधित अनेक गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात हेअर केअरमध्ये थोडासा निष्काळजीपणा केल्यास टाळूची मोठी समस्या उद्भवू शकते. अनेक वेळा केवळ पावसाचे पाणीच नाही तर कोरडी टाळू, खाण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीच्या शॅम्पूचा वापर, केसांमध्ये घाम येणे आणि फंगल इन्फेक्शन देखील डोक्यात खाज सुटण्यास कारणीभूत ठरू शकते. तुम्हाला सुद्धा टाळूला खास सुटण्याची समस्या असेल आणि तुम्ही याने त्रस्त झाला असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. हे घरगुती उपाय तुमम्हाला या समस्यपासून सुटका देण्यास मदत करू शकतात.

खोबरेल तेल

खोबरेल तेलात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केस मजबूत ठेवण्यास मदत करतात आणि टाळूची खाज देखील दूर करतात. हा उपाय करण्यासाठी नारळाचे तेल हलके गरम करून कापसाच्या साहाय्याने टाळूवर लावा. हे तेल केसांना ३ तास लावून ठेवा. यानंतर केसांना शॅम्पू करा.

ट्रेंडिंग न्यूज

एरंडेल तेल

हा उपाय करण्यासाठी १ चमचा एरंडेल तेलात १ चमचा खोबरेल तेल आणि १ चमचा मोहरीचे तेल मिसळून केसांना चांगली मसाज करा. हे तेल रात्रभर केसांमध्ये लावून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर नॉर्मल पाण्याने केस धुवा.

अॅपल साइडर व्हिनेगर

हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही वरदान मानले जाते. अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे टाळूला खाज सुटण्यापासून ते संसर्गापर्यंतच्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात. हा उपाय करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा अॅपल साइडर व्हिनेगर मिक्स करा. हे केसांना लावा आणि १० मिनिटे राहू द्या. नंतर केसांना शॅम्पू करा. हा उपाय आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा करा.

मेथी

पावसाळ्यात डोक्यावर खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मेथीदाणे आणि मोहरीचा वापर करू शकता. हा उपाय करण्यासाठी मेथी दाणे आणि मोहरीची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना २० मिनिटे लावून ठेवा. ठरलेल्या वेळेनंतर नॉर्मल पाण्याने केस धुवून घ्यावेत.

बेकिंग सोडा

हा उपाय करण्यासाठी २ चमचे बेकिंग सोड्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट हलक्या हातांनी केसांना लावून घ्या. साधारण २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel