मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: रंग नाका-तोंडात गेल्यामुळं घसा खवखवतोय? उपयुक्त आहेत हे घरगुती उपाय

Home Remedies: रंग नाका-तोंडात गेल्यामुळं घसा खवखवतोय? उपयुक्त आहेत हे घरगुती उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 26, 2024 02:44 PM IST

Sore Throat Remedies: अनेक वेळा होळीला रंग खेळताना गुलाल तोंडात जातो. तसेच कडक उन्हात पाणी खेळल्याने सुद्धा बहुतेकांचा घसा दुखतो. त्यावर घरगुती उपाय जाणून घ्या

घसा खवखवणे, घसा दुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
घसा खवखवणे, घसा दुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय (unsplash)

Home Remedies for Sore Throat: होळीला रंग खेळल्यानंतर बहुतांश लोक शरीरावरील रंग काढण्यात व्यस्त असतात. तर काही लोकांची तब्येत बिघडते. अनेकदा लोकांना घशाचा त्रास होतो. खरं तर होळीच्या दिवशी लोक रंग खेळतात, पण कधी कधी या रंगांमुळे घशात समस्या निर्माण होतात. काहींना घसा खवखवतो. हे संसर्गाचे लक्षण आहे. या काळात घशात दुखणे, खवखवणे, थंडी वाजून येणे किंवा ताप येऊ शकतो. घसादुखीचा सामना कसा करावा, यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हे काही घरगुती उपाय करू शकता.

घसादुखीचा सामना करण्यासाठी घरगुती उपाय

- ज्येष्ठमध शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. घसा खवखवल्यास ज्येष्ठमधाचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा आणि हळू हळू चोखत रहा.

- घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी प्रथम पाण्यात एक किंवा दोन चिमूटभर मीठ टाका आणि नंतर पाणी कोमट करा. यानंतर एक ग्लास कोमट पाण्याने सुमारे पाच मिनिटे गार्गल करा.

- घसादुखी दूर करण्यासाठी आले सोलून पाण्यात टाका आणि थोडा वेळ उकळू द्या. पाणी अर्धे झाले की प्या. यामुळे घसा खवखवणे किंवा दुखत असल्यास खूप आराम मिळतो.

- मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात जे घसा खवखवणे, घसा दुखणे, खोकला आणि सर्दीपासून मुक्त होण्यास प्रभावी आहेत. घसा दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी गरम पाण्यात मध मिसळून प्या.

- लसूण देखील वेदना हाताळण्यास मदत करू शकते. गरम किंवा भाजलेला लसूण घशासाठी फायदेशीर आहे. यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे व्हायरल इन्फेक्शन दूर करण्यात चांगले प्रभावी आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel