Home Remedies To Store Chickpeas: अनेकदा किटकांच्या प्रादुर्भावामुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू खराब होतात. बहुतांश महिला अनेकदा धान्य खाणाऱ्या कीटकांमुळे खूप चिंतित असतात. हे कीटक इतके लहान असतात की दाण्यांमध्ये छिद्र पाडून आत प्रवेश करतात. जर ते एका गोष्टीत अडकले आणि त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते सर्व वस्तू खराब करू शकतात. हरभरा आणि छोले यामध्ये हे भुंगे किंवा माइट्स खूप लवकर दिसतात. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपायांचा अवलंब करून त्यांचा सामना करू शकतो. हरभरा आणि छोले यांना साठवण्यासाठी काय करावे, कोणत्या ट्रिक्स फॉलो कराव्या हे जाणून घ्या.
१. जर तुमच्या घरात कडधान्ये आणि डाळी जास्त काळ साठवून ठेवली असतील तर तुम्ही ही रेमिडी ट्राय करू शकता. यासाठी संपूर्ण लाल मिरची वापरा. सुक्या लाल मिरच्या थेट हरभरा ज्या डब्यात साठवला आहे त्यात ठेवाव्यात. मिरचीचा वास दाण्यांपासून कीटकांना दूर ठेवतो. तुम्ही घरातील ज्येष्ठ महिलांना या उपायाबद्दल सांगताना ऐकले असेल.
२. हरभरा किंवा छोले यांसारख्या वस्तू नेहमी हवाबंद काचेच्या डब्यात ठेवा जेणेकरून कीटक त्यात प्रवेश करणार नाहीत. तथापि वेळोवेळी तपासत रहा. साठवताना त्या डब्यात किंवा कंटेनरमध्ये ओलावा नसल्याची खात्री करा.
३. हरभरा आणि छोले किडींपासून वाचवण्यासाठी डब्यात दोन-चार तमालपत्र टाका. त्याचा तीव्र सुगंध हरभऱ्यात पसरतो आणि त्यांना कीटकांपासून दूर ठेवतो. तमालपत्राचा वास हरभऱ्यातील ओलावा शोषून घेतो. त्यामुळे कीटक दिसणार नाहीत.
४. तुम्ही हरभरा आणि छोलेमध्ये दालचिनी देखील घालू शकता. त्याच्या वासामुळे कीटक हरभऱ्यावर हल्ला करणार नाहीत आणि आपण ते दीर्घकाळ साठवू शकाल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)