New Year Party Hairstyle: तुम्ही न्यू इयर इव्हला मित्रांसोबत पार्टी करायला जाणार असाल तर त्याची तयारी तुम्ही आधीपासून केली असेल. पण शेवटच्या क्षणी हेअरस्टाईल कोणती करावी हा प्रश्न पडला का? काळजी करू नका या ३ हेअरस्टाईल तुम्हाला मदत करतील. हिवाळ्यात केस मोकळे सोडले तर ते जॅकेट आणि स्वेटरला चिकटतात. अशा स्थितीत त्यांना स्टाईल करणे अवघड जाते. अशा स्थितीत अवनीत कौरप्रमाणे तुम्हीही काही मिनिटांत या तीन हेअरस्टाईल करून सुंदर लूक मिळवू शकता.
अवनीत कौरप्रमाणे ही हेअरस्टाईल तुमच्या स्टायलिश गाऊनवर छान दिसेल. फ्रंट पार्टिशन करा आणि समोर काही केस सोडा. आणि उरलेल्या केसांसह मिड -हाय पोनीटेल बनवा आणि ट्विस्टेड वेणी घालून रबर बँड लावा. नंतर या वेणीला बनचा आकार द्या आणि यूपिनने बन फिक्स करा. ही सोपी आणि मेसी हेअरस्टाईल खूप गॉर्जियस लूक देईल.
अवनीत कौरसारखे सर्व केस कर्ली करा. नंतर त्यांना वरच्या बाजूस उचला आणि पिनच्या मदतीने मेसी पद्धतीने सेट करा. हे खूप हॉट लुक देईल. ते तुमच्या जीन्स-स्वेटरसह तुमच्या स्टायलिश ड्रेसवरही परफेक्ट दिसेल.
जर तुम्हाला पार्टीमध्ये हॉट दिसायचे असेल तर केसांची ट्विस्टेड वेणी बनवा. हे करण्यासाठी केसांमध्ये फ्रंट पार्टीशन करा आणि एक मेसी लुक देणारी पोनीटेल बनवा. नंतर पोनीटेलला ट्विस्ट करून रबर बँडच्या मदतीने ते फिक्स करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)