Sweater Jacket Design for Winter: हिवाळा सुरु झाला आणि या काळात थंडीपासून बचाव करताना मुलींना त्यांच्या स्टाइलशी तडजोड करायला आवडत नाही. पण हिवाळ्यात ख्रिसमसचे सेलिब्रेशनपासून नवीन वर्षाची पार्टी देखील असतात. यावेळी तुम्हाला तुमच्या विंटर लुकमध्ये काही नवीन हवे असेल तर लेटेस्ट डिझाइनचे ब्लेझर आणि स्वेटर्स तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करायला विसरु नका. यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही स्टायलिश दिसण्यासोबतच ट्रेंडी लूकमध्ये तयार होऊ शकाल.
या हिवाळ्यात पार्टीमध्ये तुम्हाला स्टायलिश आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये कलरफुल फ्लोरल प्रिंट ब्लेझर नक्की ठेवा. याने तुमचा लूक खूप सुंदर होईल. कतरिना कैफप्रमाणेच स्टायलिश लूकसाठी ब्लॅक बेसवर फ्लोरल प्रिंटचा ब्लेझर पुरेसा आहे. हे तुम्ही मॅचिंग ट्राउझर्स, जीन्स आणि ड्रेससोबत कॅरी करू शकता.
ओव्हरसाइज्ड चेन केलेले कार्डिगन्स देखील या सीझनमध्ये तुम्हाला ट्रेंडी लुक देतील. तुम्ही लेयरिंग करून ते घालू शकता. जेणेकरून ते थंडीपासून संरक्षण करेल आणि स्टायलिश लुक देईल. पेस्टल कलर कार्डिगन्स सहज कपड्यांशी मॅच करता येते.
हिवाळ्यात मूव्ही डेटला जायचं असो किंवा एखाद्या पार्टीला असे स्वेटर सहजपणे थंडीपासून संरक्षण करतात आणि स्टायलिश सुद्धा दिसतात. प्रिंटेड स्वेटरपासून ते क्रोचेटेड नेट पुलओव्हरपर्यंत खूप सुंदर दिसतात आणि एक परफेक्ट लुक देतात. त्यामुळे जर तुम्ही हिवाळ्यातील कपड्यांची खरेदी करणार असाल तर हे खास डिझाईन केलेले स्वेटर आणि ब्लेझर तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठेवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या