Pregnancy Snacks: प्रेग्नेंसी दरम्यान वारंवार भूक लागत आहे? ट्राय करा हे स्नॅक्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Snacks: प्रेग्नेंसी दरम्यान वारंवार भूक लागत आहे? ट्राय करा हे स्नॅक्स

Pregnancy Snacks: प्रेग्नेंसी दरम्यान वारंवार भूक लागत आहे? ट्राय करा हे स्नॅक्स

Apr 24, 2024 12:17 AM IST

Pregnancy Care Tips: गर्भधारणेदरम्यान महिलांना वारंवार भूक लागते. अशा परिस्थितीत काय खावे याबद्दल संभ्रम असतो. येथे आम्ही तुम्हाला असे काही स्नॅक्स सांगत आहोत जे प्रेग्नेंसीसाठी सर्वोत्तम आहेत.

Pregnancy Snacks: प्रेग्नेंसी दरम्यान वारंवार भूक लागत आहे? ट्राय करा हे स्नॅक्स
Pregnancy Snacks: प्रेग्नेंसी दरम्यान वारंवार भूक लागत आहे? ट्राय करा हे स्नॅक्स (unsplash)

Best Indian Snacks For Pregnancy: गरोदरपणात वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाची क्रेविंग होते आणि वारंवार भूक लागते. वारंवार लागणारी भूक भागवण्यासाठी महिला वेगवेगळ्या गोष्टी खातात. मात्र अनेक वेळा महिलांना भूक लागल्यावर काय खावे हे समजत नाही आणि अशा वेळी महिला बाजारातील गोष्टी खातात. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत येथे काही सर्वोत्तम इंडियन स्नॅक्सचे पर्याय आहेत जे तुमची भूक भागवू शकतात. हे सर्व पदार्थ गरोदर महिलेसाठी हेल्दी आहेत.

कॉर्न चाट

गरोदरपणात वारंवार लागणारी भूक भागवण्यासाठी तुम्ही कॉर्न चाट खाऊ शकता. हा एक झटपट तयार होणारा नाश्ता आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यात भाज्याही घालू शकता. हे हलके मसाले घालून तयार केले जाते आणि चवीला छान लागते. कॉर्नमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे ते आरोग्यासाठीही चांगले असते.

भाजलेला मखाना

मखाना आरोग्यासाठी खूप चांगला आहे. गरोदरपणात सतत लागणारी भूक भागवण्यासाठी तुम्ही मखाना खाऊ शकता. मखानामध्ये कांदा आणि टोमॅटो मिक्स करूनही तुम्ही मखाना चाट बनवू शकता.

व्हेज कटलेट

जर तुम्हाला खूप भूक लागली असेल तर तुम्ही व्हेज कटलेट बनवू शकता. हे बटाट्यापासून बनवता येते. त्यात बीन्स, गाजर, वाटाणा यांसारख्या भाज्या घालता येतात. हे कटलेट तव्यावर कमी तूप किंवा तेलात भाजता येतात. डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय केलेले कटलेस आरोग्यासाठीही उत्तम असतात.

भेळ

भूक लागल्यावर तुम्ही भेळ तयार करून खाऊ शकता. भेळ हा हेल्दी स्नॅकचा पर्याय मानला जातो. भेळमध्ये काकडी, टोमॅटो आणि कांदा घालून त्याची चव वाढवू शकता.

उपमा

रव्यापासून बनवलेला उपमा खाण्यास सर्वात हलका असतो. ते लवकर तयार करता येते. ही एक चवदार डिश आहे जी तुम्ही कधीही खाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner