मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sore Throat: घसा खवखवतोय किंवा दुखतोय का? या आयुर्वेदिक उपायाने मिळेल आराम

Sore Throat: घसा खवखवतोय किंवा दुखतोय का? या आयुर्वेदिक उपायाने मिळेल आराम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 30, 2023 03:12 PM IST

Winter Health Care Tips: हिवाळ्यात फक्त सर्दी खोकला नाही तर घसा खवखवणे आणि घसा दुखण्याचा सुद्धा त्रास होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही औषधांऐवजी हे आयुर्वेदिक उपाय करून पाहू शकता.

घसा खवखवण्यापासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय
घसा खवखवण्यापासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय (unsplash)

Ayurvedic Remedies for Sore Throat: हिवाळा म्हटला की सर्दी, खोकला, ताप, व्हायरल हे होतच असते. थंडीच्या काळात केलेला थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. अनेकदा सर्दीची सुरुावत घशापासून सुरू होते. घसा खवखवण्याबरोबरच खोकलाही सुरू होतो. हे हाताळण्यासाठी कधी काढा घेतला जातो तर कधी इतर विविध उपाय केले जातात. पण जर नेमकं काय करावं याबाबत तुम्ही कंफ्यूज असाल तर घसादुखीसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले हे उपाय करून पाहू शकता. हे तुम्हाला आराम देतील.

गार्गलिंग केल्याने मिळेल आराम

घसा खवखवल्यास आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार या गार्गलिंग करण्याचा सल्ला देतात. ३०० मिली पाण्यात एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मिक्स करा. आता हे पाणी ५ मिनिटे उकळवा. मग त्याला हात लावू शकता एवढे थंड किंवा कोमट करा. आता या पाण्याने दिवसातून ३ ते ४ वेळा गार्गल करा. या रेमेडीने घशाला खूप लवकर आराम मिळतो. याशिवाय तुम्ही अजूनही काही उपाय करू शकता.

- १५-२० मिली आवळ्याच्या रसात एक चमचा मध मिसळून दिवसातून दोनदा प्या.

- मुलेठी पावडर मधात मिक्स करा आणि दिवसातून एकदा कोमट पाण्यासोबत सेवन करा. या उपायामुळे घसा खवखवणे आणि दुखण्यापासून आराम मिळेल.

- २५० मिली पाण्यात एक चमचा मेथी दाणे उकळून प्या. यामुळे घसादुखीपासून आराम मिळेल.

- ४-५ तुळशीची पाने पाण्यात टाकून उकळा. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यात आले आणि मध घालू शकता. या हर्बल टीमुळे सर्दीपासून आराम मिळेल.

- रात्री झोपण्यापूर्वी दुधात सुंठ उकळून गरम गरम प्यायल्याने फायदा होतो.

- घसा दुखत असेल तर दिवसभर कोमट पाणी प्या.

- कोमट पाण्यात अर्धा लिंबू आणि मध मिक्स करून प्यावे

 

- आल्याचा एक इंच तुकडा पाण्यात उकळून हे पाणी प्या. आतड्यांच्या आरोग्यासोबतच घशालाही आराम मिळेल

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel