Bhaubeej Outfit Ideas: भाऊबीजसाठी तयार व्हायचे आहे? या अभिनेत्रींकडून शिका रेडी होण्याची पद्धत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bhaubeej Outfit Ideas: भाऊबीजसाठी तयार व्हायचे आहे? या अभिनेत्रींकडून शिका रेडी होण्याची पद्धत

Bhaubeej Outfit Ideas: भाऊबीजसाठी तयार व्हायचे आहे? या अभिनेत्रींकडून शिका रेडी होण्याची पद्धत

Nov 14, 2023 06:59 PM IST

Bhai Dooj Outfit Ideas: भाऊबीजच्या दिवशी तयार होण्यासाठी तुम्ही मेकअप आणि ड्रेसचा अजून विचार केला नसेल, तर या अभिनेत्रींचा लूक नक्की पहा. तुम्ही यापासून प्रेरणा घेऊ शकता.

भाऊबीजसाठी आउटफिट आयडिया
भाऊबीजसाठी आउटफिट आयडिया

Actress Inspired Look for Bhaubeej: दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. यंदा १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीमधील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावतात आणि त्याच्या कल्याणाची कामना करतात. आता सणासुदीचे निमित्त असल्याने मुलींना सजून तयार व्हायचे असते. पण तुम्हाला कोणता लुक कॅरी करायचा हे समजत नसेल तर तुम्ही या अभिनेत्रींच्या लूकवरून टिप्स घेऊ शकता.

 

भाऊबीजसाठी आउटफिट आयडिया
भाऊबीजसाठी आउटफिट आयडिया

शनाया कपूरसारखे पेस्टल कलर घाला

तरुण मुलींना पेस्टल कलर्स चांगले दिसतात. शनाया कपूरने पेस्टल रंग निवडला आहे. ज्यात न्यूट्रल टोनचा मेकअप आणि मॅट पिंक लिपस्टिक लूक क्लासी बनवण्यासाठी पुरेशी आहे. या भाऊबीजला असे कपडे घालून तुम्ही सुंदर दिसू शकता.

 

भाऊबीजसाठी आउटफिट आयडिया
भाऊबीजसाठी आउटफिट आयडिया

हलकी साडी निवडा

जर तुम्ही साडी नेसण्याचा विचार करत असाल तर अतिशय बारीक, नेट फॅब्रिक आणि हलक्या रंगाची साडी निवडा. हे तुम्हाला एलिगंट लुक देईल. त्याऐवजी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अशा साडीसोबत लो नीट बन ट्राय करु शकता. यासोबत नेकपीस किंवा दागिने घाला. हे खूप सुंदर लुक देईल.

 

भाऊबीजसाठी आउटफिट आयडिया
भाऊबीजसाठी आउटफिट आयडिया

कुर्त्या मध्ये पारंपारिक पध्दतीने तयार व्हा

सारा अली खानप्रमाणेच तुम्हालाही हवे असल्यास तुम्ही कुर्त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने तयार होऊ शकता. ब्राइट कलर लिपस्टिकसह कुर्त्या वर या प्रकारचा लांब नेकपीस निवडा. हे एक आकर्षक लुक देईल

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner