Janmashtami Bhog: जन्माष्टमीला कृष्णाला नैवेद्यात अर्पण केली जाते पंजिरी, पाहा खास ३ प्रकारच्या रेसिपी-try these 3 types of panjiri recipe for bhog to krishna on janmashtami ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Janmashtami Bhog: जन्माष्टमीला कृष्णाला नैवेद्यात अर्पण केली जाते पंजिरी, पाहा खास ३ प्रकारच्या रेसिपी

Janmashtami Bhog: जन्माष्टमीला कृष्णाला नैवेद्यात अर्पण केली जाते पंजिरी, पाहा खास ३ प्रकारच्या रेसिपी

Aug 22, 2024 02:15 PM IST

Panjiri Recipe: जन्माष्टमीला श्रीकृष्णाला प्रसाद अर्पण करण्यासाठी पंजिरी नक्कीच बनवली जाते. प्रत्येक जण आपापल्या पद्धत बनवतो. परंपरेनुसार पंजिरी पीठ भाजून बनवली जाते. या वर्षी काही तरी नवीन ट्राय करायचं असेल तर या ३ प्रकारे करा.

पंजिरी रेसिपी
पंजिरी रेसिपी (pexels)

3 Types of Panjiri Recipe: कृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पंजिरी. गव्हाचे पीठ, धने, बेसन, नारळ अशा अनेक गोष्टींपासून पंजिरी बनवता येते. येथे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पंजिरी कशी बनवायची ते सांगत आहोत. यावर्षी तुम्ही या ३ रेसिपी ट्राय करून कृष्णाला पंजिरीचे नैवेद्य अर्पण करू शकता. या रेसिपी खूप सोप्या आहेत आणि झटपट तयार होतात.

पारंपारिक पंजिरी रेसिपी

हे बनवण्यासाठी एका कढईत पीठ घालून कोरडे भाजून घ्यावे. पीठ मंद आचेवर सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात तूप घालून तूप शोषून घेईपर्यंत पीठ भाजत राहा. पीठ तूप शोषून घेतल्यावर त्यात भाजलेले काजू, मनुका आणि बदाम घालावे. नंतर संपूर्ण मिश्रण भाजले जाईपर्यंत ढवळा. आता गॅस बंद करून त्यात पावडर साखर घाला.

धने पंजिरी

हे बनवण्यासाठी मध्यम आचेवर कढईत १ टेबलस्पून तूप गरम करावे. नंतर तूपात काजू आणि बदाम घालून हलके तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. आता त्यांना एका बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवा. त्याच कढईत मखाना घालून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. कढईतून काढून हलक्या हाताने क्रश करा. आता उरलेल्या तुपात धने पावडर घालून तपकिरी आणि सुगंधी होईपर्यंत परतून घ्या. अधूनमधून ढवळत राहा. कढईत भाजलेले नट्स घाला आणि चांगले मिक्स करा. गॅसवरून पॅन काढून घ्या आणि मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात सुकं खोबरं आणि पावडर साखर घालून चांगले मिक्स करावे.

डिंक पंजिरी

हे बनवण्यासाठी एका कढईत तूप गरम करून मग त्यात डिंक पारदर्शक होईपर्यंत तळून घ्या. डिंकातून अतिरिक्त तेल काढून भांड्यात ठेवा. नंतर त्याच कढईत पुन्हा अर्धा चमचा तूप गरम करून त्यात किसलेला नारळ घालून मध्यम आचेवर एक मिनिट परतून डिंकमध्ये मिसळा. भाजलेल्या गव्हाच्या पिठात डिंक आणि नारळ, चिरलेले बदाम, पिपली मुळ आणि आले पावडर घालून चांगले मिक्स करावे. गॅस बंद करा नंतर पावडर साखर घालून पुन्हा मिक्स करा.