मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Reduce Face Fat: चेहरा स्लिम करण्यासाठी आणि जॉ लाइन वाढवण्यासाठी मदत करेल हे काम, ट्राय करून पाहा

Reduce Face Fat: चेहरा स्लिम करण्यासाठी आणि जॉ लाइन वाढवण्यासाठी मदत करेल हे काम, ट्राय करून पाहा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 11, 2024 07:10 PM IST

Beauty Care Tips: वयानुसार चेहऱ्यावरील चरबी झपाट्याने जमा होऊ लागते. त्यामुळे त्वचा सैल होऊ लागते आणि जॉ लाइन नाहीशी होते. अशा परिस्थितीत आयुर्वेदाने सुचवलेली ही पद्धत नक्कीच उपयोगी पडू शकते.

Resuce Face Fat: चेहरा स्लिम करण्यासाठी आणि जॉ लाइन वाढवण्यासाठी मदत करेल हे काम, ट्राय करून पाहा
Resuce Face Fat: चेहरा स्लिम करण्यासाठी आणि जॉ लाइन वाढवण्यासाठी मदत करेल हे काम, ट्राय करून पाहा

Ayurvedic Remedy to Remove Face Fat: चेहऱ्याची त्वचा सुंदर बनवण्यासाठी प्रत्येक जण खूप प्रयत्न करतो. पण त्वचा सुंदर बनवण्यासोबतच चेहऱ्याच्या आकाराची सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा २८-३० वर्षांच्या वयात चेहऱ्यावर सैलपणा दिसू लागतो. वयानुसार चेहऱ्यावर चरबी झपाट्याने जमा होऊ लगाते. आणि जॉ लाइनची तीक्ष्णताही निघून जाते. अशा परिस्थितीत आयुर्वेदाच्या मदतीने घरच्या घरी चेहरा टाइट आणि शार्प बनवता येतो. यासाठी रोज फक्त एक गोष्ट करायची आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऑइल पुलिंग करा

ऑईल पुलिंगचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वास्तविक लोक ऑइल पुलिंग करून दात निरोगी ठेवतात. पण ही पद्धत चेहऱ्याच्या फिटनेससाठीही फायदेशीर आहे. रोज सकाळी ऑइल पुलिंग केल्याने जॉ लाइन व्यवस्थित राहण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त साठाही कमी होतो. दोन ते तीन महिने सतत ऑइल पुलिंग केल्याने चेहरा स्लिम होऊ शकतो.

कसे करावे ऑइल पुलिंग

आयुर्वेदानुसार ऑइल पुलिंगसाठी तिळाचे तेल, खोबरेल तेल किंवा एरंडेल तेल वापरता येते. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे एक चमचा म्हणजे साधारण दहा ग्रॅम तेल तोंडात घेऊन ते तोंडात फिरवावे. जेणेकरून तेल लाळेत मिसळते. मग बाहेर काढा. आणि नंतर पुन्हा एकदा कोमट पाण्याने गुळणा करा आणि तोंड स्वच्छ धुवा. दररोज सुमारे ५ ते १० मिनिटे ऑइल पुलिंग केल्याने चेहऱ्यावर जमा झालेली चरबी दूर होण्यास मदत होते. सुरुवातीला ऑइल पुलिंग करायला कमी वेळ लागतो पण हळूहळू वेळ आपोआप वाढतो आणि पाच ते दहा मिनिटे सहज करता येतो.

फेस योगाही ठरू शकतो उपयुक्त

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी ऑइल पुलिंग करण्यासोबतच तुम्ही काही चेहऱ्याचे व्यायाम देखील करू शकता. फेस योगा यासाठी उपयुक्त ठरू शकतो. रोज नियमित १० ते १५ मिनिटे वेगवेगळे फेस एक्सरसाइज करून चेहऱ्याची ठेवण चांगली ठेवता येते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग