मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tricolor Recipe: प्रजासत्ताक दिनी बनवा टेस्टी 'तिरंगा ढोकळा'; नोट करा ही सोपी रेसिपी

Tricolor Recipe: प्रजासत्ताक दिनी बनवा टेस्टी 'तिरंगा ढोकळा'; नोट करा ही सोपी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 26, 2023 06:50 PM IST

Republic Day Special Recipe: प्रजासत्ताक दिनाला लोकांना त्यांच्या कपड्यांपासून खाण्यापर्यंत देशभक्तीच्या रंगात रंगायचे असते. अशा वेळी जर तुम्हालाही या खास प्रसंगी तुम्हाला काही स्पेशल बनवायचे असेल तर ट्राय करा तिरंगा ढोकळा. खूप सोपी आहे रेसिपी.

तिरंगा ढोकळा
तिरंगा ढोकळा

Tiranga Dhokla Recipe: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी लोकांना त्यांच्या कपड्यांपासून खाण्यापर्यंत देशभक्तीच्या रंगात रंगायचे असते. अशा वेळी जर तुम्हालाही या खास प्रसंगी तुमचे स्वयंपाकघर देशभक्तीच्या रंगात रंगवायचे असेल, तर चविष्ट तिरंगा ढोकळा ट्राय करा. जाणून घेऊया काय आहे त्याची रेसिपी.

तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य

- रवा - २५० ग्रॅम

- बेसन - १ कप

- दही - १ कप

- खायचा रंग - हिरवा आणि केशरी

- तेल - ४ चमचे

- लिंबू - २

- हिरवी मिरची - ४

- ताजे खोबरे (किसलेले) - २ -३ टीस्पून

- हळद - १/२ टीस्पून

- मोहरी - १ टीस्पून

- तीळ - १ टीस्पून

- कढीपत्ता - १५ - २०

- मीठ - चवीनुसार

तिरंगा ढोकळा बनवण्याची कृती

तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी प्रथम तीन वेगवेगळ्या रंगाचे बॅटर तयार करावे लागतील. यासाठी सर्वप्रथम वेगवेगळ्या भांड्यांमध्ये समान प्रमाणात २५० ग्रॅम रवा काढा. हिरवे पीठ बनवण्यासाठी रव्यामध्ये हिरवा फूड कलर घाला. केशरी पीठ बनवण्यासाठी त्यात गडद केशरी रंग घाला आणि पांढरे पिठ जसे आहेत तसेच राहू द्या. आता वेगवेगळ्या भांड्यात ठेवलेल्या पिठात दही आणि अर्धा चमचा मीठ मिक्स करा आणि तीनही भांडे १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. असे केल्याने रवा चांगला फुगतो.

आता कुकरमध्ये पाणी घालून पाणी गरम करा. आता कुकरमध्ये एक डबा ठेवून ग्रीस करून त्यात वेगवेगळ्या रंगाचे मिश्रण भरून कुकरमध्ये ठेवा. गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि कुकरला शिट्टी लावू नका. १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. यानंतर कुकरचे झाकण उघडून सुरीचे टोक ढोकळ्याला चिकटले आहे का ते पहा. जर ते ठीक असेल तर ढोकळा शिजला हे समजा. गॅस बंद करुन डबा बाहेर काढून वेगवेगळे ठेवा. ढोकळा थंड झाल्यावर काठावर सुरी चालवून ढोकळा काठापासून वेगळा करा. ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घ्या.ढोकळा चाकूने इच्छित आकारात कापून घ्या.

तडका बनवा

गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात १ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यावर मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर गॅस कमी करा आणि तेलात कढीपत्ता, तीळ घाला आणि हलके तळून घ्या. त्यात लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून हलक्या हाताने तळून घ्या. मसाला तयार आहे, गॅस बंद करा आणि चमच्याने ढोकळ्यावर तडका घाला. वर किसलेले खोबरे टाकून सजवा. तुमचा चविष्ट तिरंगा ढोकळा तयार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या