Travel Tips : तुम्ही 'या' देशात पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय फिरायला जाऊ शकता!
Foreign Travel Tips: अनेकांना परदेशात जाण्याची इच्छा असते पण पासपोर्ट नसल्यामुळे ते जाऊ शकत नाहीत. परंतु असेही काही देश आहेत जिथे जाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी पासपोर्टची गरज नाही.
तुम्हाला परदेशात जायचे आहे परंतु तुमच्याकडे पासपोर्ट नाहीये? काळजी करू नकात. कारण असे काही देश आहेत जिथे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पासपोर्टची गरज नाही. तुम्ही फक्त आधार कार्डनेच या देशाला भेट देऊ शकता. हे देश भूतान आणि नेपाळ आहेत. या दोन्ही देशात जाताना तुम्हाला पासपोर्टची गरज लागत नाही. तिथे जाण्यासाठी कोणती ओळखपत्रे आवश्यक आहेत ते जाणून घ्या.
ट्रेंडिंग न्यूज
भूतानला कसे पोहोचायचे?
भूतान हे रस्ते आणि हवाई या दोन्ही मार्गांनी जोडलेले आहे. त्यामुळे दोन्हीकडून तुम्ही इथे जाऊ शकता. भूतानला भेट देण्यासाठी, भारतीय प्रवाशांना एकतर त्यांचा पासपोर्ट सोबत ठेवावा लागतो, ज्याची वैधता किमान ६ महिने असते आणि पासपोर्ट नसल्यास, मतदार ओळखपत्र देखील काम करू शकते. मुलांसाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
नेपाळमध्ये 'या' ओळखपत्राची आहे गरज
भूतानप्रमाणेच तुम्ही नेपाळला रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने पोहोचू शकता. नेपाळमध्ये भारत ते काठमांडू अशी हवाई सेवा आहे. नेपाळ सरकारचे म्हणणे आहे की, त्यांना फक्त अशा कागदपत्रांची गरज आहे, ज्यावर तुमचे भारतीय नागरिकत्व सिद्ध होईल. तसे, नेपाळमध्ये येणे अगदी सोपे आहे. तुम्ही नेपाळमधील सुंदर मैदानांची प्रशंसा करू शकता, येथे सर्वोत्तम पर्यटन स्थळे आहेत.
तुम्ही या देशांना व्हिसाशिवाय भेट देऊ शकता
भूतान आणि नेपाळ व्यतिरिक्त असे काही देश आहेत जिथे तुम्हाला पासपोर्ट हवा आहे पण व्हिसा लागत नाही. तुम्ही व्हिसाशिवाय जगभरातील ५८ देशांमध्ये प्रवास करू शकता. मात्र, येथे पासपोर्ट आवश्यक आहे. व्हिसाशिवाय, तुम्ही मालदीव, मॉरिशस, श्रीलंका, थायलंड, मकाओ, भूतान, कंबोडिया, नेपाळ, केनिया, म्यानमार, कतार, युगांडा, इराण, सेशेल्स आणि झिम्बाब्वे यांसारख्या जगातील सुंदर देशांना भेट देऊ शकता.
विभाग