Things To So At Lakshadweep: भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशांपैकी एक असलेले लक्षद्वीप हा बेटांचा समूह आहे. हे ठिकाण जगभरातील अनेक बीच लव्हर्ससाठी एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुद्धा लक्षद्वीप ट्रेंड करत आहे. काही अहवालांनुसार फेब्रुवारी महिन्यापर्यंत या जागेसाठी ७००० बुकिंग झाल्या आहेत. तुम्ही सुद्धा येथे जाण्याचा विचार करत असाल तर लक्षद्वीपला जाण्याची सर्वोत्तम वेळ आणि तुम्ही येथे काय करू शकता ते जाणून घ्या
लक्षद्वीप हे वर्षभर भेट देण्यासारखे ठिकाण आहे. या छोट्या बेटाचे नैसर्गिक सौंदर्य आणि शांत समुद्रकिनारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. ऑक्टोबर ते मार्च हे महिने येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात.
मार्च ते मे - उन्हाळ्यात लक्षद्वीपचे तापमान २२ अंश सेल्सियस ते ३५ अंश सेल्सियस दरम्यान असते. वास्तविक येथे दिवसा खूप गरम असते तर संध्याकाळी थंडी असते.
जून ते ऑगस्ट - लक्षद्वीपमध्ये वर्षभर पर्यटकांचे स्वागत होते. हा महिना पावसाळ्याचा आहे.
सप्टेंबर ते फेब्रुवारी - हिवाळ्यातील हवामान पर्यटनासाठी योग्य असते. भेट देण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
स्नॉर्कलिंग - संपूर्ण लक्षद्वीपमध्ये स्नॉर्कलिंगसाठी आगत्ती बेट हे एक उत्तम ठिकाण आहे. कोचीहून लक्षद्वीपमधील आगत्ती बेटावर जाता येते.
स्कूबा डायव्हिंग - कल्पेनी बेटावर स्कुबा डायव्हिंगची मजा वेगळीच असते. येथील पाण्यात विदेशी माशांच्या प्रजाती सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.
फिशिंग - कदमत बेट मासेमारीच्या थरारासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण आकर्षक तलावाने वेढलेले आहे. जर तुम्हाला फिशिंग आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्या. लहान हेलिकॉप्टर राईडने या बेटावर पोहोचता येते.
काइट सर्फिंग - हा एक मजेदार वॉटर स्पोर्ट आहे, ज्यामध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. कदमत बेट हे पतंग सर्फिंग साहसांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या