Lord Rama Temples: देशाच्या विविध भागात प्रसिद्ध आहेत ही राम मंदिरे, कुटुंबासोबत दर्शनाला अवश्य जा-travel tips know the famous temples of lord ram in india ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lord Rama Temples: देशाच्या विविध भागात प्रसिद्ध आहेत ही राम मंदिरे, कुटुंबासोबत दर्शनाला अवश्य जा

Lord Rama Temples: देशाच्या विविध भागात प्रसिद्ध आहेत ही राम मंदिरे, कुटुंबासोबत दर्शनाला अवश्य जा

Jan 17, 2024 11:22 PM IST

Travel Tips: जर तुम्ही अयोध्येला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जात नसाल तर त्याऐवजी तुम्ही भारतातील रामाच्या इतर मंदिरांना भेट देऊ शकता. भारतातील प्रसिद्ध राम मंदिरे जाणून घ्या.

भारतातील प्रसिद्ध राम मंदिर
भारतातील प्रसिद्ध राम मंदिर (pexels)

Famous Temples of Lord Rama: अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर तयार आहे. या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो लोक उपस्थित राहणार आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही येथे जाण्याचा विचार करत असाल तर २२ तारखेला किंवा त्याच्या आसपास न जाण्याचा प्रयत्न करा. कारण या काळात येथे खूप गर्दी असते. त्यामुळे चांगले दर्शन घेणे कठीण होते. पण जर तुम्ही कुठे जाण्याचा विचार करत असाल तर भारतात अशी अनेक राम मंदिरे आहेत जिथे तुम्ही दर्शनासाठी तुमच्या कुटूंबासोबत जाऊ शकता. भारतातील प्रसिद्ध राम मंदिरे कोणती आहेत ती जाणून घ्या.

त्रिप्रयार श्री राम मंदिर, केरळ

असे मानले जाते की त्रिप्रयारमध्ये ठेवलेल्या मूर्तीची भगवान श्रीकृष्णाने पूजा केली होती. येथील आकर्षक शिल्पे आणि लाकडावरील कोरीव काम हे पाहण्यासारखे आहे. हे याला भारतातील सर्वोत्कृष्ट राम मंदिरांपैकी एक बनवते.

काळाराम मंदिर, नाशिक

काळाराम मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक येथील पंचवटी येथे असलेल्या भारतातील सुंदर राम मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात देवी सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्थापित आहेत. वनवासाच्या दहाव्या वर्षी भगवान राम सीता आणि लक्ष्मणासोबत पंचवटीत गोदावरी नदीच्या काठी वास्तव्यास आले होते, असे मानले जाते.

रघुनाथ मंदिर, जम्मू

जम्मूचे रघुनाथ मंदिर हे उत्तर भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात मुघल शैलीतील वास्तुकलेचा रंग पाहायला मिळतो. या मंदिर परिसरात सुमारे सात मंदिरे आहेत जी हिंदू धर्मातील इतर देवतांना समर्पित आहेत.

रामास्वामी मंदिर, तमिळनाडू

भारताच्या दक्षिणेकडील राज्य तमिळनाडू स्थित रामास्वामी मंदिर हे अतिशय सुंदर आहे. तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्या. रामास्वामी मंदिराला दक्षिण भारतातील अयोध्या म्हटले जाते. या मंदिरात भरत आणि शत्रुघ्न यांच्यासह राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती पाहायला मिळतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग