Travel Tips: महिलांनो फिरायला जाताय? मग, तुमच्या पर्समध्ये आवर्जून ठेवा ‘या’ ५ गोष्टी! नक्की उपयोगी पडतील-travel tips for womens going for a trip then keep these 5 things in your purse ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Tips: महिलांनो फिरायला जाताय? मग, तुमच्या पर्समध्ये आवर्जून ठेवा ‘या’ ५ गोष्टी! नक्की उपयोगी पडतील

Travel Tips: महिलांनो फिरायला जाताय? मग, तुमच्या पर्समध्ये आवर्जून ठेवा ‘या’ ५ गोष्टी! नक्की उपयोगी पडतील

May 15, 2024 06:47 PM IST

Travel Tips For Womens: जेव्हा तुम्ही एकट्यानेच प्रवास करत असता, तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी तुम्ही तुमच्या बॅगमध्ये काही गोष्टींचा समावेश आवर्जून करायला हवा.

महिलांनो फिरायला जाताय? मग, तुमच्या पर्समध्ये आवर्जून ठेवा ‘या’ ५ गोष्टी! नक्की उपयोगी पडतील
महिलांनो फिरायला जाताय? मग, तुमच्या पर्समध्ये आवर्जून ठेवा ‘या’ ५ गोष्टी! नक्की उपयोगी पडतील

Travel Tips For Womens: सध्या मे महिना सुरू आहे. काही लोक आपल्या कुटुंबासोबत तर काही लोक एकटेच फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. काही लोक जवळच्या तर, काही लोक लांबच्या ट्रीपचं आयोजन करत आहेत. प्रवास करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. विशेषतः जेव्हा तुम्ही एकट्यानेच प्रवास करत असता, तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी तुम्ही तुमच्या बॅगमध्ये काही गोष्टींचा समावेश आवर्जून करायला हवा. विशेषत: जर तुम्ही एक महिला असाल आणि कोणत्याही अडचणींशिवाय तुमची सहल पूर्ण करायची असेल, तर तुमच्या हँडबॅगमध्ये ‘या’ काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करा.

मल्टी पाउच मेकअप बॅग

मेकअप हा केवळ तुमचे सौंदर्य वाढवण्याचा एक मार्ग नाही, तर स्वतःला इतरांसमोर सादर करण्याचा आणि आपला आत्मविश्वास वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही कामासाठी प्रवास करत असाल किंवा विश्रांतीसाठी फिरायला जात असाल, तर स्वत:सोबत एक मल्टी पाउच मेकअप बॅग नक्की ठेवा. या मल्टी-पाऊच मेकअप बॅगमध्ये तुम्ही मेकअप, लोशन आणि टॉयलेटरीज एकत्र ठेवू शकता. ही बॅग कॉम्पॅक्ट असते आणि सगळ्या गोष्टी कॅरी करता येतात.

Watermelon For Skin: चेहऱ्यावर टरबूज लावल्याने होईल फायदा, चमकदार त्वचेसाठी असे लावा

बँड-एड

बँड-एड ही एक साधी पण अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. प्रवास करताना खरचटणे, फोड, कीटक चावणे किंवा शू बाईटच्या जखमा अशा अनेक समस्या अचानक येऊ शकतात. अशा परिस्थितीत, बॅगमध्ये बँड-एड ठेवल्यास तुम्हाला तुमच्या जखमेवर ताबडतोब उपचार करता येईल आणि भविष्यातील संसर्ग टाळता येईल.

टिश्यू पेपर

टिश्यू पेपर ही एक आवश्यक वस्तू आहे, जी तुम्ही प्रवास करताना नेहमी तुमच्या बॅगेत आवर्जून ठेवली पाहिजे. याचा उपयोग अनेक गोष्टींसाठी करता येतो. जसे की, घाण साफ करणे, हात स्वच्छ करणे, मेकअप पुसून काढणे किंवा घाम पुसणे अशा अनेक गोष्टींसाठी टिश्यू कमी येतो.

International Day of Families : का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

जास्तीचे टॅम्पॉन्स किंवा पॅड

महिलांनी नेहमी त्यांच्या बॅगमध्ये अतिरिक्त टॅम्पॉन्स किंवा पॅड ठेवावे, जर तुमची मासिक पाळी लवकर किंवा उशीरा आली तर आयत्या वेळी ते उपयुक्त ठरू शकतात.

सेफ्टी पिन

सेफ्टी पिन्स लहान पण अतिशय उपयुक्त गोष्टी आहे. प्रवासादरम्यान तुमचे कपडे कधी फाटू शकतात किंवा उसवू शकतात. अशावेळी अनेकदा आपली पंचाईत होते. अशावेळी सेफ्टी पिन तुम्हाला काही सेकंदात या समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकते.

Whats_app_banner
विभाग