Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

May 20, 2024 12:16 AM IST

Char Dham Yatra: केदारनाथ ते यमुनोत्री, गंगोत्रीचे दरवाजे उघडले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या मंदिरांचे दरवाजे दर्शनासाठी उघडले जातात. केदारनाथ दर्शनासोबत या ठिकाणांना नक्की भेट द्या.

केदारनाथच्या आजूबाजूला पाहण्यासारखे ठिकाणं
केदारनाथच्या आजूबाजूला पाहण्यासारखे ठिकाणं (unsplash)

Must Visit Places Near Kedarnath Temple: केदारनाथपासून यमुनोत्री, गंगोत्रीपर्यंतचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे लोक या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी निघतील. पण तुम्हाला माहित आहे का की हिमालयाच्या उंच शिखरावर वसलेल्या भगवान शिवशंकराच्या या मंदिराच्या आजूबाजूला आणखी बरेच काही पाहण्यासारेख आहे. जे पाहिल्याशिवाय हा संपूर्ण प्रवास अपूर्णच राहील. चला तर जाणून घ्या केदारनाथच्या यात्रेदरम्यान कोणत्या ठिकाणांना अवश्य भेट दिली पाहिजे. या ठिकाणांना आनंद घ्यायला विसरू नका.

गौरीकुंड

केदारनाथला ट्रेकिंगची सुरुवात गौरीकुंड धामपासूनच होते. परंतु या ठिकाणाला केवळ प्रारंभ बिंदू मानू नका. गौरीकुंडमध्ये गरम पाण्याच्या दोन तलावासोबतच पार्वतीचे मंदिरही आहे. जे प्राचीन काळापासून बनवले गेले आहे. या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की देवी पार्वतीने येथील खडकावर बसून ध्यान केले होते. त्यामुळे गौरीकुंड येथून ट्रेक सुरू करण्यापूर्वी या मंदिराला आणि जवळच्या गरम तलावाला नक्की भेट द्या.

भैरवनाथ मंदिर

केदारनाथ मंदिरापासून फक्त १ किलोमीटर अंतरावर भैरवनाथाचे मंदिर बांधले आहे. तिथे जाण्यासाठी गौरीकुंडातून जावे लागते. केदारनाथ मंदिरात गेल्यावर लोक या मंदिराला नक्कीच भेट देतात. त्यामुळे भैरवनाथ मंदिराच्या आजूबाजूचे प्रेक्षणीय स्थळ पाहिल्याशिवाय ही ट्रीप अपूर्ण राहू शकते.

तुंगानाथ मंदिर

तुंगनाथ मंदिराची गणना जगातील सर्वोच्च शिव मंदिरांमध्ये केली जाते. जर तुम्ही केदारनाथला जाणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. तिथे जाण्यासाठी तुम्ही सहज टॅक्सी किंवा कॅब घेऊ शकता. ३ किमीच्या ट्रॅकनंतर मंदिरापर्यंत पोहोचता येते. तुंगानाथ मंदिराला तृतीय केदारनाथ असेही म्हणतात. इतक्या दूरवर आल्यानंतर अनेकदा लोक या मंदिराला भेट देतात.

चंद्रशिला ट्रॅक

गौरीकुंड ते तुंगानाथ मंदिरापर्यंतच्या ट्रॅकला चंद्रशिला ट्रॅक म्हणतात. त्यावर चालत गेल्यावर खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतात.

वासुकी तलाव

केदारनाथला गेल्यावर लोक हे तलाव पाहण्यासाठी पायी जातात. ८ किमीचा ट्रेक खूप कठीण आहे. कारण रात्रीच्या वेळी येथे थांबता येत नाही आणि केदारनाथ मंदिरात परत यावे लागते. पण सकाळी या ट्रेकिंगला सुरुवात करून वासुकी तालला पोहोचता येते. जिथून बर्फाळ वासुकी तालाचे नजारे प्रेक्षणीय आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner