Long Weekend Travel: पुढच्या आठवड्यात मिळतायत ५ सुट्ट्या, लाँग वीकेंड एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी जा!-travel tips best places to visit in august long weekend ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Long Weekend Travel: पुढच्या आठवड्यात मिळतायत ५ सुट्ट्या, लाँग वीकेंड एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी जा!

Long Weekend Travel: पुढच्या आठवड्यात मिळतायत ५ सुट्ट्या, लाँग वीकेंड एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी जा!

Aug 06, 2024 11:02 PM IST

Travel Tips in Marathi: ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या लाँग वीकेंडला तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा पार्टनरसोबत फिरायला जायचं प्लॅन करू शकता. तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊ शकता हे जाणून घ्या.

लाँग वीकेंडला फिरण्यासाठी ठिकाणं
लाँग वीकेंडला फिरण्यासाठी ठिकाणं (unsplash)

Places To Visit in August Long Weekend: लाँग वीकेंड आले की बहुतेक लोक फिरण्याचा बेत आखतात. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला लाँग वीकेंड मिळत असून या दरम्यान तुम्ही तुमचे कुटुंब, मित्र किंवा पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकता. जर तुम्ही या महिन्यात फक्त १ दिवस सुट्टी घेतली तर तुम्ही संपूर्ण ५ दिवस फिरण्याची मजा घेऊ शकता. खरंतर १५ ऑगस्टला गुरुवार आहे आणि या दिवशी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे. यानंतर १६ तारखेला सुट्टी घेतल्यास १७ तारखेला शनिवार, १८ तारखेला रविवार आणि त्यानंतर १९ तारखेला रक्षाबंधन अशी सुट्टी असते. एकंदरीत, आपण पूर्ण ५ दिवसांची सुट्टी मिळवू शकता आणि फिरायला जाण्याचे उत्तम प्लॅन बनवू शकता. या दिवसांमध्ये तुम्ही कुठे भेट देऊ शकता अशी काही ठिकाणं येथे पाहा.

 

कामशेत

महाराष्ट्रात जवळपास कुठे जायचं असेल तर पुण्याजवळील कामशेत हे उत्तम पर्याय आहे. या गावात तुम्ही सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. या अतिशय सुंदर दृश्यांमध्ये तुम्ही पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता. पॅराग्लायडिंग प्रेमींसाठी ही चांगली जागा आहे. हे शिकण्यासाठी येथे स्कूलही आहे.

कनाताल

कनाताल हे उत्तराखंडमधील एक छोटेसे गाव आहे. शांतता आणि दिलासा शोधणारे येथे भेट देऊ शकतात. कॅम्पिंग आणि ट्रेकिंगचा आनंदही येथे घेता येतो.

कसोल

दिल्लीच्या जवळ कसोलला जाऊ शकता. पार्वती खोऱ्यात ट्रेक करण्यासाठी या ठिकाणाला भेट द्या.

कुद्रेमुख

हे ठिकाण कर्नाटक राज्यातील चिकमंगलूर जिल्ह्यात असलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. मोठी हिरवीगार झाडे आणि समृद्ध जैव शोधण्यासाठी या ठिकाणी भेट देता येते.

लॅन्सडाउन

ही जागा इंग्रजांची छावणी म्हणून स्थापन झाली. शहरी जीवनातून बाहेर पडण्यासाठी आणि शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी ही जागा उत्तम आहे.

वायनाड

वायनाडला 'केरळचे उटी' म्हटले जाते. दक्षिण भारतातील वन्यजीव आणि हिरवीगार झाडे आपण येथे अनुभवू शकता.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. जिथे तुम्ही मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत जाऊ शकता. ट्रेक दरम्यान तुम्ही इथले नैसर्गिक चमत्कारही पाहू शकता.

स्पीती

हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती जिल्हा एक प्रकारे थंड वाळवंट आहे. अशा वेळी स्पितीला भेट देणे हा एक साहसी अनुभव ठरू शकतो. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहून मन प्रसन्न होईल.

तवांग

तवांगमधील बौद्ध मठ जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. येथील तवांग मठ हा आशिया खंडातील सर्वात मोठा बौद्ध मठ आहे.

तीर्थन व्हॅली

तीर्थन हे ऑफबीट डेस्टिनेशन आहे. ट्रेकिंग, मासेमारी, वन्यजीव राष्ट्रीय उद्यानासाठी ही शांत दरी उत्तम आहे. नदीकाठी इथल्या थंडपणाचा आनंद नक्की घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग