Rajasthan Travel Places : प्राचीन इमारती, राजेशाही राजवाडे आणि शाही घरे यासाठी प्रसिद्ध असलेले राजस्थान हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समृद्ध इतिहासाचे प्रतीक असलेले राजस्थानचे भव्य राजवाडे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. पण, ही ठिकाणे जितकी सुंदर आहेत, तितकीच ती झपाटलेली असल्याचे देखील म्हटले जाते. जर तुम्ही देखील राजस्थानमध्ये फिरायला जायचा विचार करत असाल, तर तुम्ही या चर्चित ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.
आपल्या भितीदायक इतिहासासाठी प्रसिद्ध असलेला भानगढ किल्ला केवळ राजस्थानच नव्हे तर संपूर्ण भारतातील भीतीदायक ठिकाणांमध्ये गणला जातो. या जागेची एक रंजक कथा आहे. असं म्हटलं जात की, येथील एक तांत्रिक राजकन्येच्या प्रेमात पडला. तांत्रिकाला काळी जादू करून राजकुमारीला मिळवायचे होते. मात्र, जेव्हा राजकन्येला हे कळाले, तेव्हा तिने तांत्रिकाला मारले. मात्र, मृत्यूपूर्वी तांत्रिकाने संपूर्ण राजवाड्यात काळी जादू पसरवली. यानंतर भानगड किल्ल्यावर काही अनैसर्गिक घटना घडू लागल्या, असे म्हटले जाते. हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मात्,र सूर्यास्तानंतर या ठिकाणी जाण्यास बंदी आहे.
कुलधारा हे राजस्थानचे अतिशय रहस्यमय गाव आहे, जिथे राजस्थानच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते. मात्र, या गावातील लोक अचानक एक दिवशी गायब झाले. एक रात्रीत हे गाव कुठे गेले, याबद्दल कुणालाच माहीत नाही. तर, या गावाबद्दल आणखी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
सुंदर अरवली डोंगराच्या काठावर वसलेल्या नाहरगड किल्ल्यावरून जयपूर शहराचे दृश्य अतिशय नयनरम्य आहे. किल्ल्याच्या आकाशाला भिडणाऱ्या भिंती राजघराण्याची भव्यता दर्शवतात. या किल्ल्याबद्दल लोकांचे म्हणणे आहे की, इथल्या राजाकहा आत्मा आजही या किल्ल्याचे रक्षण करतो.
राजस्थानच्या चित्तौडगड येथे असलेला राणा कुंभ पॅलेस हा राजपूती वास्तुकलेमध्ये बांधलेला एक सुंदर राजवाडा आहे. जेव्हा अलाउद्दीन खिलजीने राजवाड्यावर हल्ला केला. तेव्हा राणी पद्मिनीने राजवाड्यात उपस्थित असलेल्या महिला अनुयायांसह जौहरचे वचन पाळले होते. तेव्हापासून या राजवाड्याबद्दल काही आख्यायिका चर्चिल्या जातात.
जयपूरमध्ये स्थित जलमहाल हे देखील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हा पाच मजली राजवाडा आहे. या जलमहालाचे चार मजले मानसागर तलावात बुडाले आहेत. या महालाबद्दल अनेक गोष्टी चर्चेत असतात.
संबंधित बातम्या