जुलै-ऑगस्ट महिन्यात भरपूर पाऊस पडतो. यंदाच्या मोसमात झालेला मुसळधार पाऊस पाहून बहुतांश लोक खूश आहेत. अनेकजण अशा पावसात बाहेर पडून फिरायला जायचा प्लान करतात. जर तुम्हीही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात फिरण्यासाठी एखाद्या चांगल्या ठिकाणाच्या शोधात असाल आम्ही तुम्हाला काही ठिकाणे सांगत आहोत. या ठिकाणांना तुम्ही कुटुंबीयांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत जाऊन भेट देऊ शकता.
सुंदर हिमालयीन दृश्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, जिथे जाणे बहुतेक तरुणांना आवडते.
उत्तराखंडमधील अल्मोडा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येतो. या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जाणे योग्य असते.
वाचा: “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात", अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट
डलहौसी हे देखील एक ऑफबीट हिल स्टेशन आहे. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. पॅराग्लायडिंगसारख्या रोमांचक सफरीचा तुम्ही येथे आनंद घेऊ शकता.
मित्रांसोबत फिरण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. पण, या महिन्यांत तुम्हाला इथल्या कुठल्याही अॅक्टिव्हिटीचा आनंद घेता येणार नाही. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर बसून पावसाचा आनंद नक्कीच घेता येणार आहे.
तलाव आणि बागांच्या मध्ये वसलेल्या काश्मीरला पृथ्वीचा स्वर्ग म्हटले जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कश्मिरचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. त्यामुळे या काळात काश्मीरला जाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकते.
वाचा: श्रेया मोठा गेम झाला यार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मसूरीजवळच्या शांत ठिकाणी जायचं असेल तर धनोल्टी हा योग्य पर्याय आहे. जुलै आणि ऑगस्ट हा काळ येथे जाण्यासाठी एकदम उत्तम आहे.
मलाना हे हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध गाव आहे. येथील संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
शांत निसर्गात तिबेटी संस्कृती पाहून सुट्टी घालवायची असेल तर मॅक्लोडगंज या ठिकाणाला भेट द्या.
वाचा: जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!
राजस्थानमधील हे एकमेव हिल स्टेशन आहे जिथे थंड वारे आणि खडक तुमचे मन जिंकतील.
मसूरी या ठिकाणाला पर्वतांची राणी म्हटले जाते. येथे सुंदर धबधबे पाहून तुम्ही शांततेत थोडा वेळ घालवू शकता.
संबंधित बातम्या