Travel Guide: १५ ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांसाठी डेस्टिनेशन ठरले नाही? या ठिकाणांना भेट द्या-travel guide here are places to visit during the 15 august and raksha bandhan holiday ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Guide: १५ ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांसाठी डेस्टिनेशन ठरले नाही? या ठिकाणांना भेट द्या

Travel Guide: १५ ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांसाठी डेस्टिनेशन ठरले नाही? या ठिकाणांना भेट द्या

Aug 10, 2024 11:09 PM IST

Places to Visit: १५ ऑगस्ट आणि रक्षाबंधनासह सुमारे ५ दिवस सुट्ट्या मिळत आहेत. अशा वेळी तुम्ही फिरण्याचा प्लॅन करू शकता. येथे पाहा अशी ठिकाणं जेथे तुम्ही ट्रॅव्हल करू शकता.

१५ ऑगस्ट, रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी ठिकाणं
१५ ऑगस्ट, रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी ठिकाणं (unsplash)

Best Destinations to Visit: प्रवासाची आवड असणारे लोक अनेकदा दीर्घ सुट्ट्यांची वाट पाहत असतात. तुम्हीही दीर्घ सुट्ट्यांमध्ये फिरायला जात असाल तर १५ ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या सुट्ट्या तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. या दरम्यान तुम्हाला ५ दिवसांची सुट्टी मिळत आहे. अशा वेळी डेस्टिनेशन सिलेक्ट करण्यात अडचण येत असेल तर इथे काही ठिकाणं पाहा जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता.

सिक्कीम

सिक्कीमला ईशान्य भारतातील सात बहिणींचा भाऊ म्हटले जाते. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. प्राचीन तलाव आणि धबधब्यांपासून गरम झरे आणि भारतातील सर्वात उंच पर्वतांच्या उंच शिखरांपर्यंत सिक्कीममध्ये पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. १५ ऑगस्ट - रक्षाबंधनाच्या सुट्टीत तुम्ही या सुंदर ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता.

पाचगणी

हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. पाचगणी हे मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी विकेंडचे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. पाचगणी पाच हिरव्यागार डोंगरांनी सुंदरपणे वेढलेली आहे. या हिल स्टेशनचे नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायक हवामान आनंद घेण्यासारखे आहे.

उटी

उटी हे दक्षिण भारतातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. इथलं दृश्य अतिशय सुंदर असते. हिरवीगार जंगले, सुंदर बगीचे, मोठमोठी धरणे आणि डोंगरांनी वेढलेले तलाव तुम्हाला आनंद देतील.

गंगटोक

गंगटोक हे सिक्कीम राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे ठिकाण हिमालय पर्वत रांगेवरील शिवालिक डोंगरापासून १४३७ मीटर उंचीवर वसलेले आहे. त्सोमो लेक, बन झाकरी, ताशी व्ह्यू पॉईंट अशा ठिकाणांना जरूर भेट द्या.

पाँडिचेरी

हे येथील पर्यटन आकर्षणांमध्ये भारतीय आणि फ्रेंच यांचे सुंदर मिश्रण आहे. मनमोहक रस्त्यांपासून ते प्राचीन समुद्रकिनारे आणि कोलोनियल इमारतींपर्यंत इथं पाहण्यासारखं बरंच काही आहे. भारतातील आकर्षणापैकी एक असलेल्या या फ्रेंच शहरात सुट्टी घालवण्यासाठी येऊ शकता. पाँडिचेरीमध्ये फिरायला गेलात तर इथली सुंदर ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग