Places to Visit in May: उन्हाळ्यात काही काम नसताना घराबाहेर पडणे कठीण वाटते. पण जेव्हा विषय फिरण्याचा येतो तेव्हा प्रत्येक जण पटकन तयारी करतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतेक लोक फिरायला जायचा विचार करतात. या हंगामात लोक कुटुंब आणि मित्रांसह प्रवास करण्याचा विचार करतात. पण अनेकदा उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ठिकाण ठरवणे कठीण वाटते. येथे आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही मे महिन्यात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जाऊ शकता. जाणून घ्या मे महिन्यात फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणं कोणती आहेत.
लॅन्सडाउन हे एक सुंदर शहर आहे जे सुट्टीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. उत्तराखंडचे लॅन्सडाउन हे ब्रिटीश काळापासून एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. बर्फाच्छादित पर्वत आणि हिरव्यागार जंगलांमध्ये लॅन्सडाउन आपल्या सुंदर वातावरणाने तुम्हाला मंत्रमुग्ध करू शकते.
हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग हे सुंदर शहर अॅडव्हेंचरसाठी बेस्ट आहे. हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी सर्वोत्तम मानले जाते. हे पॅराग्लायडिंगसाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह येथे फिरायला जाऊ शकता.
तवांग हे एक सुंदर शहर आहे, ज्यात अप्रतिम ठिकाणे आहेत जी पर्यटकांना मंत्रमुग्ध करू शकतात. सुंदर मठ, धबधबे आणि शांत दृश्यांसह, तवांग हे फिरण्यासाठी एक अद्भूत शहर आहे. येथे फिरायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
मुन्नार हे भारतातील काही सर्वात मोठ्या चहाच्या मळ्यांचे घर आहे. हिरवेगार आणि उंच टेकड्या असलेल्या या ठिकाणी तुम्ही मे महिन्यात भेट देऊ शकता. तुम्ही इथे पोथामेडू व्ह्यूपॉइंट, चोकरामुडी पीक, एराविकुलम नॅशनल पार्क, इको पॉइंट या सारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)