मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Guide: हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट आहेत काश्मीरचे हे सुंदर ठिकाणं, एकदा नक्की जा!

Travel Guide: हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट आहेत काश्मीरचे हे सुंदर ठिकाणं, एकदा नक्की जा!

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 07, 2023 09:06 PM IST

Best Places in Kashmir: हिवाळ्यात काश्मीरचे सौंदर्य आणखी खुलते. जानेवारीमध्ये येथे हेवी स्नोफॉल होते. तुम्ही इथे जाण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे नक्की पहा.

काश्मीरमधील बेस्ट ठिकाणं
काश्मीरमधील बेस्ट ठिकाणं (Pexel)

Places to Visit in Kashmir in Winter: काश्मीरला 'पृथ्वीवरील स्वर्ग' म्हणतात. काश्मीर हे नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आहे जे काश्मीर खोऱ्याचे अस्सल वातावरण दाखवते. केशरची शेते, सुंदर दऱ्या, पर्वत, नद्या आणि जंगलांचे मनमोहक दृश्य काश्मीरमध्ये पाहण्यासाठी सर्वोत्तम आहे. या ठिकाणी राहून तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता आणि अनेक अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता. हिवाळ्यात तुम्हाला थंडी थोडी त्रासदायक वाटू शकते. पण जर तुम्हाला साहस आवडत असेल तर तुम्ही हे ठिकाण तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता.

गुरेज

गुरेज हे काश्मीरमधील अशा ठिकाणांपैकी एक आहे जे अतिवृष्टीमुळे हिवाळ्यात पर्यटकांसाठी बंद असते. मात्र ते स्कीइंगसारख्या हिवाळी खेळांसाठी चांगले आहे. पर्यटकांसाठी गुरेजचे सौंदर्य अनुभवण्याचा आणि दृश्यांचा आनंद घेण्याचा हा एक मार्ग आहे.

गुलमर्ग

काश्मीरमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत समाविष्ट केलेले, गुलमर्ग हे त्याच्या निर्मळ नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. गुलमर्ग हे 'फिल्ड ऑफ फ्लॉवर्स' म्हणून प्रसिद्ध आहे.

दाचीगाम राष्ट्रीय उद्यान

हे आणखी एक डेस्टिनेशन आहे, जिथे तुम्ही पर्यटनासाठी जाऊ शकता. नॅशनल पार्कमधील समृद्ध वन्यजीव पाहून तुम्हाला नक्कीच भुरळ पडेल. ट्रेकिंगसाठी हे एक चांगले ठिकाण आहे.

सोनमर्ग

सोनमर्गचे निसर्ग सौंदर्य हिवाळ्यात आणखीनच वाढते. तुम्ही तुमच्या कुटुंबासह येथे प्रवास करत असाल तर हे एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. सोनमर्ग हे काश्मीरमधील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. संपूर्ण काश्मीर मधील काही सर्वात सुंदर ट्रेकिंग ट्रेल्सचे पैकी एक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या