Travel : निसर्ग सौंदर्याचा अद्भुत नजारा पाहायचाय? भंडारदरा ठरेल परफेक्ट ठिकाण! काय काय बघाल?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel : निसर्ग सौंदर्याचा अद्भुत नजारा पाहायचाय? भंडारदरा ठरेल परफेक्ट ठिकाण! काय काय बघाल?

Travel : निसर्ग सौंदर्याचा अद्भुत नजारा पाहायचाय? भंडारदरा ठरेल परफेक्ट ठिकाण! काय काय बघाल?

Jan 06, 2025 04:33 PM IST

Traveling In Maharashtra : भंडारदरा पर्यटन स्थळ हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे.

Bhandardara
Bhandardara

Traveling In Maharashtra : हिरव्यागार दऱ्यांमध्ये निळ्या आकाशाला स्पर्श करणारे पर्वत, मनमोहक धबधबे, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, पुष्पगुच्छांनी सजवलेले रानफुलांचे कॉरिडॉर हे स्वर्गीय दृष्य महाराष्ट्रातील भंडारदरा येथील सुंदर खोऱ्यांमध्ये... इथल्या वातावरणात इतकं आकर्षण आहे की, माणूस इथे आला की, इथलाच होऊन जातो. हे ठिकाण विशेषतः निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि साहसप्रेमींसाठी ओळखले जाते. याशिवाय येथे असलेले प्राचीन मंदिरही यात्रेकरूंच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मुंबईजवळील भंडारदरा पर्यटन स्थळ हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. येथील हिरवळ आणि तलाव पर्यटकांना आकर्षित करतात. भंडारदरा येथे तुम्ही धबधबे, धरणे आणि ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

अमृतेश्वर मंदिर

अमृतेश्वर मंदिर हे मंदिर ११००मध्ये हेमाडपंथी शैलीमध्ये बांधले गेले होते. हे मंदिर पवित्र प्रवरा नदीच्या काठावर बांधले गेले आहे. सुंदर दगडी मंदिर आजही दिमाखात उभे आहे. या मंदिरात एक शिवलिंग आहे, जे स्वयंभू मानले जाते. जवळच 'विष्णुतीर्थ' नावाचे तलाव आहे. त्याची प्राचीन स्थापत्य शैली आहे. मंदिराचे प्रवेशद्वार मंडपमपासून सुरू होते. येथे येणारे भाविक भगवान शंकराची पूजा करतात आणि या पवित्र ठिकाणी शांतता अनुभवतात. मंदिर परिसर हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे, ज्यामुळे त्याचे वातावरण अत्यंत शांत आहे. पावसाळ्यात हे शिवलिंग पाण्याने झाकलेले असते.

रंधा फॉल्स

शेंडी गावापासून १० किमी अंतरावर रंधा धबधबा हे प्रवरा नदीवरील नैसर्गिक सौंदर्याचे ठिकाण आहे. रंधा धबधब्याकडे जाणारा रस्ताही खूप सुंदर आहे, त्यावर चालत गेल्यास नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटता येतो. १७० फूट उंचीवरून हा धबधबा कोसळतो आणि कड्यावरून खाली पडून एक अद्भुत दृश्य निर्माण करतो. पावसाळ्यात रंधा धबधबा खूपच सुंदर दिसतो. या धबधब्याचा प्रवाह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो.

Beautiful Railway Routes: भारतातील टॉप ५ सर्वात सुंदर रेल्वेमार्ग, एकदा तरी नक्की करा प्रवास

अगस्ती आश्रम

असे मानले जाते की श्री अगस्ती ऋषींनी एक वर्ष फक्त हवा आणि पाण्यावर राहून इथे ध्यान केले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना प्रवरा नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा नदीचा प्रवाह इथे अवतारीत झाला. या शतकानुशतके जुन्या स्थानाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. असे मानले जाते की, भगवान राम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण हे श्री अष्टी ऋषींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. ऋषींनी रामाला एक बाण दिला, जो त्यांनी रावणाला मारण्यासाठी आणि पत्नी सीतेला वाचवण्यासाठी वापरला. नदीच्या काठावर असलेला आश्रम आजही पर्यटकांना आकर्षित करतो. अगस्ती आश्रम हे भंडारदरा येथे स्थित एक धार्मिक स्थळ आहे.

आर्थर तलाव

आर्थर तलाव हे भंडारदरा येथील एक प्रमुख आकर्षण आहे, जिथे पर्यटक बोटींग करू शकतात किंवा किनाऱ्यावर बसून आराम करू शकतात. आजूबाजूला पसरलेली हिरवाई या ठिकाणाला अतिशय आकर्षक बनवते. आर्थर लेकवरील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासारखा आहे, ज्यामुळे लोक आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह या ठिकाणी सहलीला येतात.

रतनगड किल्ला

रतनगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक होता. हा किल्ला मराठा साम्राज्याचा इतिहास सांगतो. रतनवाडी आणि भंडारदरा तलावाच्यावर हा ४०० वर्ष जुना किल्ला आहे. गडाच्या माथ्यावरून तुम्हाला कळसूबाई डोंगराचे आणि अग्रभागातील तलावाचे खास फोटो बघायला मिळतील. रतनगडचे तीन दरवाजे गणेश दरवाजा, त्र्यंबक दरवाजा आणि हनुमान दरवाजा.किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे 'सुईच्या डोळ्या'सारखी दिसणारी नैसर्गिक खडक निर्मिती, ज्याला नेधा असेही म्हणतात. रतनगड किल्ला हे भंडारदरा जवळील ऐतिहासिक स्थळ आहे, जे ट्रेकिंग प्रेमींना आकर्षित करते.

Whats_app_banner