Travel : जगातील सगळ्यात महागडे देश, एक कप चहासाठी मोजावे लागतात तब्बल ८०० रुपये!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel : जगातील सगळ्यात महागडे देश, एक कप चहासाठी मोजावे लागतात तब्बल ८०० रुपये!

Travel : जगातील सगळ्यात महागडे देश, एक कप चहासाठी मोजावे लागतात तब्बल ८०० रुपये!

Feb 02, 2025 01:49 PM IST

Most Expensive Countries : तुम्हालाही परदेश प्रवासाची आवड असेल, आणि एखादा देश शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या देशांबद्दल सांगणार आहोत.

जगातील सगळ्यात महागडे देश, एक कप चहासाठी मोजावे लागतात तब्बल ८०० रुपये!
जगातील सगळ्यात महागडे देश, एक कप चहासाठी मोजावे लागतात तब्बल ८०० रुपये!

Foreign Travel Trips : बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडते. आपल्या व्यस्त कामातून थोडासा वेळ काढून कुठेतरी बाहेर जाऊन येणं आणि रीलॅक्स होणं अनेकांना आवडतं. जेव्हा अशा लोकांना आपल्या कामातून मोकळा किलतो, तेव्हा ते प्रवासासाठी बाहेर पडतात. काही वेळा मोठी सुट्टी मिळाली की, लोक परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन देखील करतात. जर तुम्हालाही परदेश प्रवासाची आवड असेल, आणि एखादा देश शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या देशांबद्दल सांगणार आहोत. इथे फिरायला जाताना तुम्हाला तुमचं बजेट देखील मोठं ठेवावं लागणार आहे. या देशात केवळ चहा-कॉफी प्यायल्याने देखील तुमचे बजेट बिघडू शकते. म्हणूनच, जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल आणि या देशांची नावे तुमच्या यादीत असतील तर, आधीच तुमचे बजेट थोडे वाढवा.

बर्म्युडा

बर्म्युडा हा उत्तर अटलांटिक महासागरातील एक ब्रिटिश बेट आहे. बर्म्युडा हा प्रदेश तेथील गुलाबी वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे बेट उत्तर अमेरिका खंडापासून सुमारे १००० किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी दैनंदिन वस्तू इतर देशांतून आयात केल्या जातात. त्यामुळे इथे कस्टम ड्युटी जास्त आहे. यामुळेच या देशाची गणना सर्वात महागड्या देशांमध्ये केली जाते. जर, एखाद्या व्यक्तीने बर्म्युडामध्ये घर भाड्याने घेतले तर त्याला दरमहा तब्बल २००० डॉलर्स म्हणजेच सुमारे १.७२ लाख रुपये खर्च करावे लागतील. या बेटावर प्रवास करणे किती महाग आहे, हे आता तुमच्या लक्षात आलेच असेल.

Travel : राजस्थानमधील 'या' जागा दिसायला सुंदर, पण संध्याकाळनंतर बदलून जातो चेहरामोहरा! तुम्ही पाहिल्यात का?

स्वित्झर्लंड

निसर्ग सौंदर्याचा विचार केला, तर स्वित्झर्लंडचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. परंतु, या देशात फिरणे अतिशय महाग आहे. सर्वात जास्त खर्चिक म्हणजे इथे राहणे महाग आहे. जर, तुम्ही स्वित्झर्लंडला ५ दिवसांसाठी जात असाल आणि दोन लोक असाल तर, तुमच्याकडे किमान ६ ते ७ लाख रुपये खिशात असेलच हवेत. जर, तुम्ही इकडे खरेदी केली तर हे आकडे आणखी वाढू शकतात. स्वित्झर्लंडमध्ये हॉटेलच्या खोल्या खूप महाग आहेत. त्यामुळे या देशात जात असाल, तर बजेट वजनदार असायलाच हवे.

नॉर्वे

नॉर्वेचे नैसर्गिक सौंदर्य जगभर प्रसिद्ध आहे. हा तोच देश आहे जिथे हिवाळ्यात सकाळी ९ वाजता सूर्य उगवतो. आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे सूर्य दुपारी ३ वाजता मावळतो. उन्हाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी सूर्य ४ वाजता सूर्य उगवतो आणि रात्री ११ वाजता मावळतो. या अनोख्या देशात प्रवास करणेही खूप महाग आहे. या देशात रेस्टॉरंटमध्ये खाणे आणि कार भाड्याने घेणे येथे खूप महाग आहे. येथे तुम्हाला एका कप चहासाठी ८०० रुपये खर्च करावे लागतील.

Whats_app_banner