मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Milk Recipes: भारतातील विविध भागात दुधापासून बनतात ‘हे’ भन्नाट ड्रिंक्स! तुम्हीही घरच्या घरी बनवून ट्राय करू शकता!

Milk Recipes: भारतातील विविध भागात दुधापासून बनतात ‘हे’ भन्नाट ड्रिंक्स! तुम्हीही घरच्या घरी बनवून ट्राय करू शकता!

Jun 02, 2024 09:35 AM IST

Milk Drinks Recipes: केरळच्या लोकप्रिय सांभारम या पेयापासून ते उत्तर भारतातील दूध सोडापर्यंत, अनेक मिल्क-बेस्ड रिफ्रेशिंग ड्रिंक्स तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. चला जाणून घेऊया अशाच काही भन्नाट रेसिपी…

भारतातील विविध भागात दुधापासून बनतात ‘हे’ भन्नाट ड्रिंक्स!
भारतातील विविध भागात दुधापासून बनतात ‘हे’ भन्नाट ड्रिंक्स!

Milk Drinks Recipes: दूध हा जगभरातील अनेक लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडांना मजबुती देऊन, शरीर बळकट बनवते. लहान असो वा मोठे, दूध सगळ्यांसाठीच लाभदायी आहे. मात्र, या गरमीच्या मोसमात भारतातील विविध भागात दुधापासून काही भन्नाट रिफ्रेशिंग ड्रिंक्स तयार केली जातात. चला जाणून घेऊया त्यातील काही रेसिपी…

ट्रेंडिंग न्यूज

दूध सोडा, उत्तर भारत

दूध सोडा हे उत्तर भारतात लोकप्रिय असलेले एक ताजे उन्हाळी पेय आहे. यासाठी थंड दूध कार्बोनेटेड सोडा, साखर आणि कधीकधी चिमूटभर मीठासह एकत्र करून अनोखी चव असणारे ड्रिंक तयार केले जाते. वेस्टिन मुंबई गार्डन सिटीचे एक्झिक्युटिव्ह सू शेफ अमनदीप सिंह सांगतात, 'दूध आणि सोडा यांच्या मिश्रणाने एक रिफ्रेशिंग आणि कूलिंग ड्रिंक तयार होते, जे उष्णतेवर मात करण्यास मदत करते.

साहित्य :

१ वाटी थंड दूध

१ वाटी थंड सोडा,

१-२ चमचे साखर

चिमूटभर मीठ

बर्फाचे तुकडे

कृती :

> एका उंच ग्लासमध्ये थंड केलेले दूध घालावे.

> त्यात हळूहळू थंड केलेला सोडा घाला.

> आत त्यात साखर घाला आणि पूर्ण विरघळेपर्यंत ढवळा. जर आपल्याला थोडी चव वाढवायची असेल आणि आवडत असेल तर, आपण चिमूटभर मीठ देखील घालू शकता.

> बर्फाचे तुकडे घाला आणि ताबडतोब हे ड्रिंक सर्व्ह करा.

Heatwave Asthama: उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उद्भवू शकते दम्याची समस्या! ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

अविल मिल्क, केरळ

केरळमधील अविल मिल्क हे सगळ्यांचे आवडते पेय आहे, जे पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. अविल म्हणजेच पोहे, दूध, साखर आणि केळीपासून बनवलेले हे ड्रिंक स्नॅक किंवा ब्रेकफास्ट पर्याय म्हणून देखील घेता येते. शेफ अमनदीप सिंह यांच्या मते, ‘अविल दूध त्याच्या समृद्ध, मलईयुक्त टेक्स्चरमुळे जेवणाचा किंवा नाश्त्याचा पर्याय म्हणून देखील पसंत केले जाते.’

साहित्य :

१ वाटी बारीक पोहे

१ वाटी थंड दूध

१-२ चमचे साखर

१ पिकलेलं केळं

१ चमचा भाजलेले शेंगदाणे

१ चमचा वेलची पूड

बर्फाचे तुकडे

कृती :

> पोहे थोडा वेळ वाहत्या पाण्याखाली धुवून घ्या.

> एका उंच ग्लासमध्ये पोहे घ्या.

> पोह्यांवर थंड केलेले दूध घाला, साखर घाला आणि ते विरघळेपर्यंत ढवळा.

> त्यात चिरलेले केळी आणि भाजलेले शेंगदाणे घाला.

> या ड्रिंकवर वेलची पूड घालावी.

> त्यावर बर्फाचे तुकडे घाला आणि ताबडतोब सर्व्ह करा.

Anxiety Attack: रात्रीची झोप खराब करू शकते एंग्जायटीची समस्या, या मार्गांनी करा स्वतःला शांत

सांभरम, केरळ

सांभरम हे थंड करण्याच्या गुणांसाठी प्रसिद्ध असलेले उन्हाळ्यातील एक उत्कृष्ट पेय आहे. आयटीसी ग्रँड सेंट्रल, मुंबईचे सूस शेफ शेफ दीक्षा रेड्डी याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणतात, "हे रिफ्रेशिंग पेय दही पाण्यात मिसळून मसाले, औषधी वनस्पती आणि कधीकधी आले आणि हिरव्या मिरच्या घालून बनवले जाते. उष्णतेवर मात करण्यासाठी आणि डिहायड्रेशन रोखण्यासाठी उन्हाळ्याच्या महिन्यांत हे मुख्य आहे."

साहित्य :

ताजं ताक

हिरव्या मिरच्या

आले

कढीपत्ता

मीठ

हिंग

मोहरी

कृती :

> एका मोठ्या भांड्यात ताक गुळगुळीत होईपर्यंत फेटून घ्या.

> हिरवी मिरची, आले आणि कढीपत्ता बारीक चिरून घ्या.

> ताकात मीठ आणि चिमूटभर हिंग आणि चिरलेले साहित्य घाला.

> चव वाढवण्यासाठी, या पेयाला आपण मोहरीची फोडणी घालू शकता.

> सर्व्ह करण्यापूर्वी एकत्र चांगले मिक्स करा आणि कमीतकमी ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.

> थंड गार सर्व्ह करा.

WhatsApp channel