हल्ली हवाबंद जेवणाचे डबे यायला लागले असले तरी अजूनही बहुतांश लोक स्टीलचे डबे आणि नॉर्मल लंच बॉक्स वापरतात. या डब्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यात कितीही कोरडी भाजी भरली तरी त्याचे तेल बाहेर पडते. हे तेल संपूर्ण लंच बॉक्स तसेच संपूर्ण बॅग आणि कपडे घाण करते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही सोपे उपाय आणले आहेत. या टीप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा स्टील लंच बॉक्स स्पिलप्रूफ बनवू शकता.
तुम्ही घरातील मोठ्यांना पाहिलं असेल तर ते अनेकदा ही ट्रिक फॉलो करतात. यासाठी तुम्हाला फक्त फॉइल पेपरची गरज भासणार आहे. या फॉइल पेपरचा वापर करुन तुम्ही स्टीलचा डब्बा स्पिलप्रूफ बनवू शकता. फॉइल पेपरचा मोठा तुकडा कापून घ्यावा. आपल्या भाजीच्या डब्याच्या वर तो लावा आणि नंतर झाकण लावण्यापूर्वी तो फॉइल पेपर नीट लागला आहे की नाही हे पाहा. फॉईल पेपरचा आकार थोडा मोठा असावा जेणेकरून झाकण बंद झाल्यानंतरही त्याचे कोपरे बाहेरच्या बाजूला राहतील हे लक्षात ठेवा. या सोप्या ट्रिकने तुमच्या लंच बॉक्समधून काहीही बाहेर पडणार नाही.
Maharashtra Krishi Din Wishes: महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा द्यायच्यात? दिग्गज नेत्यांच्या खास पोस्ट नक्की पाहा
रबर अनेकदा कोणतीही गोष्ट घट्ट करण्यासाठी वापरला जातो. आपण एअरटाइट डब्बे पाहिले असतील. या डब्ब्यांच्या झाकणाला रबर लावलेला असतो. याच्या मदतीने तुम्ही तुमचे नॉर्मल टिफिन घट्ट बंद करू शकता. हा उपाय करण्यासाठी आधी तुम्हाला रबर घ्यावा लागेल. हे रबर थोडे जाड असल्याची खात्री करा. त्याला मधोमध कापून टाका. आता हा रबर आपल्या टिफिनच्या झाकणात एक-एक करून चिकटवून ठेवा. सुमारे पाच ते सहा रबर पुरेसे असतील. आता त्यात पाणी भरून तपासून घ्या. तुमच्या लक्षात येईल की तुमचा नॉर्मल लंच बॉक्सही घट्ट झाला आहे आणि त्यातून काहीही गळत नाहीये.
वाचा: लसूण देईल चमकदार ग्लोइंग स्किन, तुम्ही ट्राय केलंय का व्हायरल गार्लिक इटिंग चॅलेंज?
अशा प्रकारे तुम्ही फॉइल पेपर आणि रबरचा वापर करुन डब्बातून तेल किंवा भाजी गळ्यापासून थांबवू शकता.
संबंधित बातम्या