Weight Gain in Winter: हिवाळ्यात लोक अनेकदा तक्रार करतात की त्यांचे वजन सतत वाढत आहे. मात्र वजन वाढण्यास अनेक कारणे जबाबदार असू शकतात. परंतु सर्वात मोठे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीचे चयापचय मंदावणे हे आहे. जर तुम्ही हिवाळ्यात या समस्येने त्रस्त असाल तर या टिप्स जाणून घ्या. हे हिवाळ्यात तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतील.
हिवाळ्यात व्यक्तीचे चयापचय खूप मंद होते. पण या ऋतूत शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी व्यक्ती जास्त कॅलरीज घेते. जास्त काळ जास्त कॅलरी असलेले अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे वजन झपाट्याने वाढू लागते.
व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. थंडीमुळे पाणी पिणे टाळत असाल तर कोमट पाणी प्या.
गरम पाणी पिण्याव्यतिरिक्त तुम्ही स्वत: ला उबदार ठेवण्यासाठी कांजी, हळदीचे दूध, काश्मिरी कहवा, सूप, शोरबा, हर्बल टी यांसारखे पेय घेऊ शकता. या सर्व गोष्टी केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर शरीराला आतून उबदार ठेवण्यास देखील मदत करतील.
अनेक वेळा थंडीमुळे लोक व्यायाम करण्यात आळशी होतात. पण तज्ञ सांगतात की जर तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा नसेल, तर एरोबिक्स, झुंबा यांसारख्या इनडोअर अॅक्टिव्हिटीजला घरीच तुमच्या रुटीनचा भाग बनवा.
हलवा, लाडू यांसारख्या गोष्टी हिवाळ्यात भरपूर खाल्ल्या जातात. असे नाही की हे खाऊ नये. पण त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले पाहिजे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही या ऋतूत मिळणाऱ्या हिरव्या भाज्यांकडेही लक्ष दिले पाहिजे. हिरव्या भाज्या शरीराला डिटॉक्स करून वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हिवाळ्यातील उन्हात नक्की बसा. कारण डी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे वेट लॉस जर्नी कठीण होऊ शकते. म्हणूनच हिवाळ्याच्या हंगामात अगदी थोड्या वेळासाठी का होईना पण सन बाथचा म्हणजे उन्हात बसण्याचा आनंद घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)