साडी हा भारतीय परंपरेचा भाग आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला अनेक डिझाइन्स आणि फॅब्रिक पाहायला मिळतील. प्रत्येक ऋतूसाठी वेगवेगळ्या कापडामध्ये साड्या येतात. उन्हाळ्यात लोकांना सुती साड्या नेसायला आवडतात. तर हिवाळ्यात सिल्क साडी नेसण्याकडे महिलांचा कल असतो. लग्नात बहुतेक लोक रेशमी साड्या नेसतात. पण ही रेशम म्हणजेच सिल्क साडी कशी ओळखावी असा प्रश्न सर्वांना पडतो. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत...
शुद्ध रेशीमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पोत. कापडाच्या पृष्ठभागावर आपली बोटे हळूवारपणे फिरवा. शुद्ध रेशीम स्पर्शाला गुळगुळीत, मऊ आणि किंचित थंड असते. दुसरीकडे सिंथेटिक रेशीम निसरडा किंवा जास्त चिकट असते.
वाचा: “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात", अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट
साडीच्या कमी दिसणाऱ्या भागातून काही धागे काढून जाळून पाहा. शुद्ध रेशीम असेल तर ते हळूहळू जळेल. तसेच जळताना त्याचा वास केस जळल्यानंतर येतो तसा येईल. नंतर राख होईल. सिंथेटिक मिक्स असेल तर प्लॅस्टिकसारखा वास येईल.
शुद्ध रेशमी साड्यांमध्ये अनेकदा जड विणकाम असते. अशावेळी साडीवरील विणकाम हे काळजीपूर्वक पाहा. ज्या डिझाइन्स खूप परफेक्ट दिसतात किंवा खोलीचा अभाव आहे ते सिंथेटिक फॅब्रिक मिक्स असण्याची शक्यता असते.
वाचा: श्रेया मोठा गेम झाला यार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
साडीवर पाण्याचा एक छोटा थेंब टाकावा. शुद्ध रेशीम असेल तर पाणी हळूहळू शोषले जाईल, पण सिंथेटिक कापड असेल तर पाणी घसरते.
वाचा: जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!
साडी प्रकाशासमोर धरून पाहा. कापडातून प्रकाश चमकत असेल तर त्यात धागे किंवा सिंथेटिक मिश्रणांची संख्या कमी असू शकते. यावरुन तुम्हाला साडी कशी आहे हे ओळखता येईल.
संबंधित बातम्या