Hair care tips in marathi : कमी वयात डोक्यावरचे किंवा दाढीचे केस पांढरे होणे ही खरंतर अनेकांसाठी डोकेदुखी असते. काही वेळा फक्त एक-दोन केस पांढरे होतात आणि ते नेमके लोकांच्या नजरेत भरतात. मग सभा-समारंभ, सण-उत्सवाच्या काळात पांढऱ्याचं काळं करणं हा एकच पर्याय उरतो. ही गोष्ट खर्चिक आणि कटकटीची ठरते.
फक्त खर्च आणि त्रासाची गोष्ट असती तर ठीक आहे, पण वारंवार डाय केल्यानं केस आणखीच पांढरे होऊ लागतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि तरीही सुंदर दिसण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायद्याचे ठरू शकतात. त्यात पांढरे केस शिताफीनं लपवण्याची पद्धत अतिशय परिणामकारक ठरते. यामुळं पांढरे केस सहज लपून राहतातच, शिवाय उर्वरित केस पांढरे होण्यापासून ही बचाव होतो. त्यामुळं केस काळे करण्याचा झटपट मार्गही तुम्हाला माहीत आहे.
केसांवर किंवा कपाळाजवळ पांढरे केस दिसत असतील तर ते लपवण्यासाठी तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता.
कालबाह्य झालेल्या काजळाच्या मदतीनं पांढरे केस लपवता येतात. काजळाच्या ब्रशमध्ये खूप काळा रंग असतो. जे लावल्यानं पांढरे केस लपतात आणि केस काळे करण्यासाठी रासायनिक रंगाची गरज लागत नाही.
दोन बदाम चिरून कापसात भरून वात तयार करा. मग ही वात एका दिव्यात ठेवा. त्यावर तिळाचं तेल घालून वर एक झाकण ठेवा. जेणेकरून दिव्यातून निघणारा धूर गोळा होईल. संपूर्ण दिवा पेटल्यावर वर ठेवलेली थाळी उचलावी. ज्यावर काळा धूर जमा झालेला असतो. हाच घट्ट काळा धूर म्हणजे काजळी किंवा काजळ असते. एखाद्या छोट्याशा कुपीत ही काजळी ठेवा. त्यात कोरफडीचा चीक घालून पेस्ट तयार करून साठवून ठेवा. जेव्हा तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल आणि डोक्यावर पांढरे केस दिसतील तेव्हा पांढरे केस लपवण्यासाठी जुन्या काजळाचा ब्रश किंवा साध्या ब्रशच्या मदतीनं हे केसांना लावा.